पान:निवडक अंतर्नाद.pdf/२७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एखादी पंडितकौशकी आपल्या नृत्यातील जाणकारीने स्पर्धेसाठी परीक्षक बनते. पण ते तिच्या वयाला शोभणारेच असते. एखादी उमा कडकडीत तपः साधना करून, खंडनमंडनात्मक वादविवादात बटूला तोडीस तोड ठरते. पण तीही शिवाला सांगते, "मी काही 'घरघुशी' नाही. माझ्या पित्याची रीतसर संमती घ्या. मगच मी विवाहाला उभी राहीन." या सर्व स्त्रियांत आपल्या तेजस्वी वृत्तीने अगदी वेगळी, आधुनिक म्हणून दिसते ती फक्त सीता. कुटुंब, समाज यांच्या अपेक्षांनुसार वागून आणि वयामुळेही थोडा अधिकार प्राप्त करून घेतलेली 'मालविकाग्निमित्रा' तली धारिणी, 'विक्रमोर्वशीया तली काशीराजपुत्री या स्त्रिया आपल्या पतीला त्याच्या भ्रमरवृत्तीबद्दल बोलतात, येमणे देतात, अंतः पुरात काही थोडे राजकारणही करतात. पण त्यांनाच पुढे वाईट वाटते आणि अशोकदोहदपूर्तीच्या निमित्ताने म्हणा, प्रियप्रसादनव्रत पार पाडायचे म्हणून म्हणा, त्या राजाच्या नव्या प्रेमप्रकरणाला मान्यताच देतात. एखादी हंसपदिका अगदी आर्ततेने संगीतातून आपल्या दुःखाला हळुवार वाचा फोडते, तर मानिनी, तडकफडक वृत्तीची इरावती अग्निमित्राला अतिशय उग्रपणे बोलते, नव्हे, त्याला कंबरपट्टयाने मारायलाच निघते. पण अग्निमित्राने तिचे पाय धरून सपशेल लोटांगण घातल्यावर चडफडत का होईना तिथून निघून जाते. (अर्थात राजाही तिची फिकीर करणारच नसतो. ही पायधरणी ह्य आपला एक दाखवण्याचा, शठ नायकाच्या 'दाक्षिण्या'चाच भाग असतो, ही गोष्ट वेगळी.) म्हणजे हेही सारे वागणे हे 'भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गम:' (नवऱ्याने कितीही अपमान केला तरी रागावून त्याच्या उलट जाऊ नकोस) या उपदेशाचेच आचरण, घालून नायकाचे व्यक्तिमत्त्व घडवीत असतो. म्हणून तर समीक्षकांना नायकांचे धीरोदात्त, धीरोद्धत, धीरललित आणि धीरप्रशांत असे चार प्रकार करता आले. तसे पाहिले तर आता उल्लेखिलेल्या स्त्रिया या सहनायिका किंवा उपनायिका आहेत. मुख्य नायिका नव्हेत, मग मुख्य नायिका कोणाला म्हणायचे? 'साहित्यदर्पणा' त नायिकेची वेगळी अशी व्याख्या नाही. नायकाचे गुण सांगून विश्वनाथ म्हणतो की साधारणपणे हेच गुण नायिकेच्या ठिकाणी असावेत. ते कोणते? नायक असतो त्यागशील, पराक्रमी, उच्चकुलीन, उमद्या देखण्या व्यक्तिमत्त्वाचा, संपन्न, रूपयौवनयुक्त, उत्साही, जागरूक, ज्याच्यावर लोक भाळतील असा, तेजस्वी, चतुर आणि सुशील, हे सारे वर्णन आहे स्थूलमानाने प्रत्येक नायकाच्या ठिकाणी प्रत्येक गुण असतोच असे नाही. शिवाय या गुणांचे स्वरूपही देशकालपरिस्थितीनुसार पालटतेच नाही तर सारे नायक एकाच ठशाचे गणपती झाले असते. हे गुण म्हणजे त्यांची सर्वसामान्य ठेवण किंवा शरीररचना (anatomy) आहे. प्रत्येक कवी त्या रचनेची चौकट कमी अधिक प्रमाणात वापरून, इतर मालमसाला २७४ निवडक अंतर्नाद मुख्य नायिकेच्या बाबतीत हेच सारे विवेचन लागू आहे या नायिकेच्या ठिकाणी 'नायकसामान्य' गुण 'यथासंभव लागू पडतात असे सांगून विश्वनाथ नायिकांचे 'स्वा किंवा स्वीया, अन्या आणि साधारणा' असे तीन प्रकार सांगतो, हे भेद पाहताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते की त्यात प्रमुख भर आहे तो नायिकेचे देहसौंदर्य, वय, मदनविकारानुकूलता यांवर, आणि दुसरे असे की ती कोणत्याही वर्गातली असो, नायक कसाही असला तरी त्याच्यावर रागावून रुसून शेवटी त्याचा स्वीकारच करणारी असते. स्वीया नायिका विनय, आर्जव या गुणांनी युक्त, गृहकर्मतत्पर आणि पतिव्रता असते. अन्या नायिका दुसऱ्या पुरुषाची पत्नी किंवा अपरिणीता, सलज्जा आणि नवयौवना असते. तर साधारणा म्हणजे वेश्या, तिच्या व्यवसायानुसार ती धीर आणि कलाप्रगल्भ असते. हिच्या संदर्भात सर्वांत जास्त तपशील आले आहेत. जुन्या संस्कृत काव्यातील कोणतीही कृती फक्त स्त्रीलाच मध्यवर्ती कल्पून लिहिलेली नाही. टॉमस हार्डीच्या 'टेस ऑफ दि डर्बरव्हिल्स या प्रसिद्ध कादंबरीत जसे टेसलाच अथपासून इतिपर्यंत महत्त्व आहे, पु. शि. रेग्यांच्या 'सावित्रीं मध्ये जसे सावित्रीलाच सर्वोच्च महत्त्व आहे, तसे स्थान संस्कृत काव्यात नायिकेला दिलेले आढळत नाही. नृत्यात नेहेमी भेटणाऱ्या स्वाधीनभर्तृका, खंडिता, अभिसारिका, कलाहान्तरिता, विप्रलब्धा, प्रोषितभर्तृका, वासकसज्जा आणि विरहोत्कंठिता या आठ शृंगारनायिका, या वर निर्देशिलेल्या मुख्य तीन नायिकांचेच प्रसंगोपात्त होणारे पोटभेद आहेत. संस्कृत विमर्शकांची शहामत अशी की एवढ्यावरच न थांबता वेगवेगळ्या अक्षांनी वर्गीकरणे आणि गुणाकार करून त्यांनी तीनशे चौयाऐंशी नायिकाभेद सांगितले आहेत! एवढ्या तपशिलात आपल्याला जाण्याचे काहीच कारण नाही. कालिदासाची तीन नाटके (मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञानशाकुंतल) दोन महाकाव्ये (रघुवंश आणि कुमारसंभव) आणि एक खंडकाव्य (मेघदूत) एवढ्या वाङ्मयसंपेदचा विचार केला तर असे दिसते की मालविका ही 'अन्या' नायिका आहे. म्हणजे कलाप्रगल्भा खरी, पण अपरिणीता, मुग्धा, नवयौवना, सलज्जा अशी. एक गुंगी गुडिया. शकुंतला पहिल्या तीन अंकांपर्यंत याच वर्गातली, तर त्यापुढे 'स्वीया' नायिका होते. सीता आणि यक्षपत्नी यांच्याप्रमाणे, 'कुमारसंभवा' तल्या उमेच्या बाबतीत ह्यच मुद्दा लागू होतो. उर्वशी ही देवांगना, म्हणजे 'साधारणा' या वर्गातली. ती धीरा, कलाप्रगल्भा अशी आहेच; पण अभिसारिका, खंडिता, कलहान्तरिता, विरहोत्कंठिता या शृंगारनायिकांचे विशेष ती अधिक ठसठशीतपणे दाखवते. पण तिला शेवटी इंद्राच्या वराने पुरूरव्याजवळ राहायला मिळते आणि तीही शेवटी 'स्वीया' नायिका होते. इत्यर्थ असा की हे सांकेतिक भेद म्हणजे या स्त्रियांच्या