पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याचे साहित्य म्हणजे सारस्वताचे झाड त्याची पाळेमुळे वास्तवात खोलवर गेली होती आणि वातावरणातील वायवादळाचेही त्याच्यावर परिणाम होत होते. सुरुवातीच्या नाटकांत सीमित व्यक्तिगत जीवनाचे सूर लागले होते पण भोवतालच्या समाजजीवनातील आनंदाची पार्श्वभूमीही होती. हळूहळू जीवनाचे रंग पालटू लागले. छोट्या-मोठ्या वर्तुळांतून निराशेचे प्रतिध्वनी उमटू लागले. वाढत्या वयाबरोबर आणि वाढत्या जाणिवांबरोबर खोलवर जाणारी परंतु पुष्कळ वेळा क्लेशदायक ठरणारी अंतर्दृष्टी येऊ लागली, नैतिक समस्यांचे ताण जाणवू लागले. सतराव्या शतकाच्या शेवटी राष्ट्राला जाणवणारी नैतिक अवनती आणि सार्वत्रिक निराशा शेक्सपीअरच्या संवेदनशील मनात प्रतिध्वनित होत होती. ह्या काळातच त्याने तीन समस्याप्रधान नाटके किंवा डार्क ट्रॅजेडीज लिहिल्या भोवताली दिसणारा सांस्कृतिक अध:पात आणि त्यामुळे जाणवणारी निराशा प्रस्तुत नाटकांना गडद रंग देऊन गेली. Man, Proud man, plays such fantastic tricks, Before high heaven, as would make the angels weep. हे उद्गार माणसाच्या नैतिक वर्तनाबद्दलच्या अविश्वासाचे द्योतकच आहेत. शेक्सपीअरची जीवनदृष्टी काळाशी एकरूप झालेली होती; किंबहुना तत्कालीन काळाशी विविध सूर पकडून शेक्सपीअरने आपली बंदिश सादर केली असे म्हणावयाला हरकत नाही. चार शोकात्मिकांमध्ये माणसांच्या क्लेशाचा त्याने विचार केला. 'किंग लिअर' मध्ये तर मानवी दुःखाची परिसीमा गाठली आहे. शेवटच्या नाटकात रोमान्सेसमध्ये प्रेमाच्या विधायकतेची शेक्सपीअरला तीव्रतेने जाणीव झालेली दिसते. भोवताली घडणाऱ्या घटना त्याच्या संवेदनांना रूप देत होत्या, पण ह्या घटनांनी निर्माण केलेल्या नैतिक तणावांवर तो नैतिक समाधान (Moral Solution ) शोधत होता आणि ते दृष्टीपथात आले ते शेवटच्या नाटकात 'टेंपेस्ट' मध्ये. उभारणीत ख्रिश्चन धर्मदृष्टीला जवळ असलेले प्रेमाधारित स्वप्न फुलू लागले. कोठल्याही महान कलावंताप्रमाणेच शेक्सपीअरच्या कल्पनाशक्तीत रूप आणि आशय एकमेकांवर सर्जनशील प्रभाव टाकत होते. जीवनदृष्टी विशिष्ट रूपाची निवड करीत होती आणि रूप- कल्पना जीवनदृष्टी साकारीत होती. तसे नसते तर शेक्सपीअरच्या हातून वेगवेगळे नाट्यप्रकार हाताळले गेले नसते आणि एकदा हाताळलेल्या प्रकाराकडे तो पुन्हा वळला नाही असे झालेही नसते. शेक्सपीअरच्या नाटकांतील मानवी जीवनाचे दर्शन अत्यंत मनोवेधक आहे. त्यात विलक्षण विविधता आहे, वैपुल्य आहे ह्यात शंकाच नाही. ह्या बाबतीत शेक्सपीअरच्या प्रश्नातीत मोठेपणाचे मानदंड सतत बदलत गेले असे शेक्सपीअर समीक्षेचा इतिहास सांगतो. एक काळ शेक्सपीअरच्या कथा मोठ्या आकर्षक वाटत होत्या. पण खरे तर त्याच्या ३६-३७ नाटकांच्या कथा सर्वस्वी त्याच्या नाहीत, कालिदास, भवभूती, सॉफोक्लिस्, किंवा युरोपाइडिया नाटककारांप्रमाणेच त्याने उपलब्ध कथांनाच नाट्यस्वरूप दिले आहे. १९व्या शतकात शेक्सपीअरचे संविधानक रचनाचातुर्य वाखाणले गेले. पण कितीतरी नाटककारांनी, विशेषत: गेल्या दोन शतकांत, अतिशय सुव्यवस्थित आणि सुविहित संविधानके सादर केली आहेत असा नाट्यांचा इतिहास सांगतो. १९व्या शतकाच्या सुरुवातीस शेक्सपीअरची स्वभावरेखनाबद्दल प्रशंसा झाली. त्याच्या काही स्वभावरेखनात कणन्कण वास्तवता आढळली तर काहींमध्ये विराट नैतिकता दिसली. काही व्यक्ती मानसशास्त्रीयदृष्ट्या जटिल वाटल्या, तर काही राजकीयदृष्ट्या चाणाक्ष वाटल्या, पण व्यक्तिरेखन हे स्वयमेव थोडेच महत्त्वाचे असते ? नाटक म्हणजे पोर्ट्रेट पेटिंग नव्हे. नाटकातील व्यक्ती एका नाट्यानुभूतीची घटक म्हणूनच आपल्यापुढे येते. तेव्हा केवळ स्वभावरेखनामुळे शेक्सपीअरचे अथवा कुणाही नाटककाराचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे कठीण आहे. म्हणून शेक्सपीअरच्या मोठेपणाचा शोध इतरत्र घेणेच आवश्यक होते. शेक्सपीअरच्या नाटकांतील रूपाला (फॉर्मला) पुष्कळ वेळा तत्कालीन साहित्यिक परंपरांचा हातभार लागलेला आहे. त्याला यशस्वी नाटके लिहावयाची होती म्हणून लोकाभिरुचीच्या नाडीवर बोट ठेवून लिखाण करणे त्याला आवश्यक होते आणि आवडतही होते. रंजनात्मक नाटके आवडतील तर तो रंजनात्मक नाटके लिहित होता, ऐतिहासिक नाटकांची मागणी असेल तर तशी नाटके, शोकांतिका लोकप्रिय होत असतील तर शोकांतिका, अशी त्याची लेखनपद्धती होती. छोट्या नाट्यगृहांसाठी संगीतप्रधान नाटक, खुल्या नाट्यगृहांसाठी व्यक्तिरेखनप्रधान नाटक असाही हा हिशोब होता. शक्यता ही आहे की निवडलेला नमुना अथवा प्रकार त्याच्या जीवनदृष्टीला चटकन वेगळा आकार देत होता. शोकान्तिकेच्या रूपाने काही गहर गंभीर नैतिक समस्यांची जीवघेणी जाणीव होऊ लागली तर संगीतप्रधान नाटकांच्या 'महाभारत' सोडल्यास शेक्सपीअरची बरोबरी इतर कुणी करू शकेल असे वाटत नाही. शेक्सपीअरच्या नाटकांतील मानवी जीवनाचे दर्शन अत्यंत मनोवेधक आहे. त्यात विलक्षण विविधता आहे, वैपुल्य आहे ह्यात शंकाच नाही. ह्या बाबतीत 'महाभारत' सोडल्यास शेक्सपीअरची बरोबरी इतर कुणी करू शकेल असे वाटत नाही. प्रीतीच्या ज्वालेत पतंगासारखी झेप घेणारा भावनाप्रधान तरुण रोमिओ, लोभीपणाची परिसीमा सहजपणे गाठणारा निर्दय शायलॉक, हास्याचे भुईनळे उडविणारा फॉलस्टाफ, क्रूरकर्मा तिसरा रिचर्ड, लाजरी बुजरी मिरांडा, खोडकर खेळकर रोझॅलिंड, बुद्धिमान पोर्शिया, तत्त्वनिष्ठेत हरवलेला ब्रुट्स आणि वा हरवलेला अँटनी, दवबिंदूसारखी स्वच्छ, निरागस डेस्डिमोना तर फेसाळलेल्या मादक मदिरेसारखी क्लिओपात्रा, जीवनाच्या गुंतागुंतीने अगतिक झालेला हॅम्लेट, महत्त्वाकांक्षेच्या अफाट गतीने जीवनपथावर फरफटत जाणारा मॅकबेथ, कृतघ्नतेच्या आघाताने वेडा झालेला अहंकारी राजा लिअर ! शेक्सपिअरचे नाट्यविश्व निवडक अंतर्नाद २६७