पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

किती सुष्ट, दुष्ट, मंगल, अमंगल, ध्येयवादी, विश्वासू, विश्वासघातकी, धार्मिक, नीतिमान, व्यवहारी, ढोंगी, प्रेमळ, ज्ञानी, अज्ञानी, लोकांनी भरलेले आहे! Here is God's plenty ! ( इथे आहे ईश्वरनिर्मित विपुलता!) पण शेक्सपीअरच्या नाटकांत मानवी जीवनाचे दर्शन म्हणजे स्थिर चित्रण नाही, रंगभूमीवर आपल्यासमोरच धागे विणले जातात, गाठी पडतात, सुटतात अथवा तुटतात, जीवन उभे राहाते. ते कधी स्थिर होते तर कधी नष्ट शेक्सपीअरचे विश्व विविध माणसांनी आणि माणसांच्या विविध वर्तनांनी गजबजले आहे त्यांच्या अपेक्षित आणि अनपेक्षित वागण्यातून परस्परसंबंधांना नाट्यमय कलाटण्या मिळतात हेही खरे आहे. पण शेक्सपीअर केवळ मानवी स्वभावाच्या दर्शनावर अवलंबून राहात नाही. मानवी जीवन म्हणजे भोवतालच्या परिस्थितीशी येणाऱ्या संबंधांचे फलित परिस्थितीच्या प्रवाहातील माणूस हा शेक्सपीअरच्या नाटकाचा विषय. म्हणूनच शेक्सपीअरचे नाटक असंख्य नाट्यमय प्रसंगांचे अविस्मरणीय भांडार झाले आहे. उदाहरणार्थ, 'मर्चंट ऑफ व्हेनिस मधील खटल्याचा प्रसंग. त्यामधील शॉयलॉकची निर्दश हुशारी व हजरजबाबीपणा, सूड घेण्याची जिद्द आणि ह्या सर्वांना तोडीस तोड म्हणून पुढे येणारी पोर्शियाची अचाट बुद्धिमत्ता, शॉयलॉकला स्वतःच्याच जाळ्यात पकडण्याची तिची विलक्षण हुशारी आणि त्याने दया दाखवावी म्हणून केलेले 'The Quality of Mercy'... हे भाषण - ह्य सारा प्रसंगच मुळी अविस्मरणीय झाला आहे. ज्युलिअस सीझर हेसुद्धा अशाच अविस्मरणीय प्रसंगांनी भरलेले एक नाटक, सीझरवर प्राणसंकट येणार म्हणून त्याने सिनेट सभेला जाऊ नये असे त्याची पत्नी त्याला विनवते, तेव्हा सीझरचे आत्मविश्वासाने भरलेले उत्तर, प्रत्यक्ष सिनेटमधे झालेला त्याचा वध, ब्रूट्सने केलेल्या वारानंतरचे सीझरचे व्यथित उद्गार, त्याच्या वधानंतर ब्रूट्स आणि अँटनी ह्यांची अंत्यसंस्काराची भाषणे... हे सगळे पाहताना आणि ऐकताना मन नेहमी संवेदनाशक्तीच्या टोकावर टांगलेले असते. प्रत्येक प्रसंग म्हणजे माणसाची इच्छाशक्ती आणि भोवतालची परिस्थिती ह्यांच्यामधील प्रभुत्वासाठी होणारा संघर्ष, हॅम्लेटची सुरुवातच मोठी वेधक आहे. Not a mouse stirring अशी भयाण रात्र, एलिनॉर किल्ल्यावर होरेशिओ आणि दोघे सहकारी पहाऱ्यावर आहेत. आदल्या दिवशी दोघांनी हॅम्लेटच्या वडिलांसारखेच दिसणारे पिशाच्च भटकताना पाहिले आहे, पण होरेशिओचा असल्या भाकड कथांवर विश्वास नाही. तेवढ्यात पिशाच्च पुन्ह्य येते जाते. होरॅशिओसकट सगळे स्तिमित होतात. डेन्मार्कच्या परिस्थितीबद्दल ते बोलतात आणि पिशाच्च पुन्हा येते. वास्तवशक्ती आणि वास्तवातीत शक्ती दोन्ही मिळून माणसांच्या जगात भोवरे निर्माण करायला लागतात आणि आपली खात्री होते की, एक तुफान येऊ घातले आहे. जेव्हा जेव्हा प्रसंग अत्यंत नाट्यपूर्ण असतो तेव्हा तेव्हा शेक्सपीअरचे काव्य अतिशय उत्कट होते. ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ऑथेल्लोच्या शेवटच्या अंकातील डेस्डिमोनाच्या वधाचे २६८ निवडक अंतर्नाद दृश्य ( अंक ५, दृश्य २) डेस्डिमोनाचा वध करण्यासाठी मध्यरात्री ऑथेल्लो सभागृहात येतो, ती निरागस स्त्री गाढ झोपलेली. जवळ मेणबत्ती जळते आहे. खिडकीतून आकाशात चमकणाऱ्या तारका दिसत आहेत. ऑथेल्ला म्हणतो, It is the cause, it is the cause, my soul, Let me not name it to you, you chaste stars, It is the Cause.... Put out the light and then put out the light.... तिची जीवनज्योत मालविण्याचा निर्णय, 'त्या' कारणाचा उल्लेख, पण निष्कलंक, शुद्ध (chaste) चांदण्यापाशी त्याचा नामनिर्देशही नको. आपल्या आत्म्याला पटविण्याची पाळी, हातातील ज्योत आणि शय्येतील जीवनज्योत ह्यांची तुलना... सारे भोवळून टाकणारे! किंग लिअरच्या शेवटच्या अंकात तर आपण अश्रूंच्या सरितेपाशीच ( vale of tears) येऊन पोहोचतो. लिअर आणि कॉर्डेलियाची भेट, मितभाषी कॉर्डेलियाचे प्रेमळ शब्द, दोघांचे कैद होणे, लिअरचे No, no, no, no, Lets away to prison... हे लहान मुलासारखे उद्गार, कॉर्डेलियाचा वध आणि लिअरचे (ब्रेडलेच्या शब्दांत) काव्याच्या अत्युच्च शिखरावर ( Peak of poetry ) नेणारे उद्गार : No, no life! Why should a dog, a horse, a rat have life; And thou no breath at all? Thou'll come no more Never, never, never, never, never! Pray you undo this button - लिअर मनावरील दुःखाच्या प्रचंड मानसिक तणावाला, छातीवरील कोटाची बटणे मोकळी करून शारीरिक पातळीवर दुःखाचा परिहार शोधतो. त्याच्या शेवटच्या शब्दांत विराटता, कारुण्य, शोकात्मता, वैफल्य अशा विविध भावांचे हृदयस्पर्शी मिश्रण झालेले आहे आणि साध्या परंतु परिणामकारक शब्दांत शेक्सपीअरने ते पकडले आहे. पण वातावरणाला काव्याने रेखीवपणे शब्दांकित करण्याचे अलौकिक सामर्थ्य जागोजागी दिसते ते मॅकबेथमध्ये, ह्या नाटकाचे सामर्थ्य नैतिक समस्येच्या विवरणात अथवा महत्त्वपूर्ण आशयापेक्षाही वातावरणनिर्मितीत आहे. भयप्रद गूढतेचे दाट धुके साया नाटकाला गुंडाळून टाकते. सारी कृती अंधाऱ्या वातावरणात घडते. ( संबंध नाटकात फक्त दोन वेळा सूर्यप्रकाश आहे.) मध्यरात्रीचा किर्र अंधार, घनदाट अरण्य, भुते, चेटकिणी, चीत्कार करणारी घुबडे आणि वटवाघुळे ह्या साऱ्यांनी सृष्टीचा ताबा घेतला आहे आणि माणसांनीही त्यांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार केला आहे. पावलोपावली हादरून टाकणारे प्रसंग तितक्याच हादरून सोडणाऱ्या शब्दांतून उभे राहतात. पाचव्या अंकातील पहिले दृष्य : लेडी मॅकबेथ हातात मशाल (taper) घेऊन झोपेतच चालत येते. ती स्वत:शीच बोलते : Hell is murky Fie, my lord, fie! A soldier and afeared ?