पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुणे पुरालेखागारातील आपल्या कचेरीत काम करताना उत्तम बंडू तुपे स्वतःशीच मी म्हणालो, 'चला, आता एकदाचा आपला लेख रीडर्स डायजेस्टमध्ये येणार,' मोठ्या उत्साहानं मी तुपेंबद्दलची सर्व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम मी 'मेहता पब्लिशिंग हाऊसच्या श्री. अनिल मेहतांना ५ ऑक्टोबर १९९३ रोजी भेटलो. रीडर्स डायजेस्टचं पत्र मिळाल्यावर दोनच दिवसांनी त्यांनी तुपेंचं पहिलं पुस्तक, 'काट्यांवरची पोटंच्या दोन आवृत्त्या छापल्या होत्या, तुपे आणि त्यांच्या साहित्याबद्दलची मेहतांची मतं मी टेप केली. दुसरी भेट डॉ. आनंद यादवांची घेतली. त्यांनी काट्यांवरची पोटंची प्रस्तावना लिहिली आहे. या दोघांनी – मेहता आणि यादव यांनी बरीच माहिती दिली. मेहतांनीच तुपेंची दुसरी कादंबरी इजाळं प्रकाशित केली आहे. या पुस्तकांसंबंधी डॉ. आनंद यादव यांच्याशी तुपेंनीही बरी चर्चा केली होती. यानंतर मी तुपेलिखित ह्यती आली ती सगळी पुस्तकं चाळली. काट्यांवरची पोटं, इजाळं, चिपाड, खुळी, भस्म, आदण (कथासंग्रह), लांबलेल्या सावल्या, झावलं इत्यादी. यादवांच्या माहितीवरून कळलं की तुपेंचं शालेय शिक्षण तिसरीपर्यंतच झालेले आहे. उत्तम तुपे मातंग समाजातले, विशिष्ट प्रकारचं गवत वाळवून दोर तयार करणं हा त्यांचा पिढीजात व्यवसाय. "पण ग्रामीण जीवनातील अनुभवांचा साठा असलेला बोलताचालता कोशच आहेत तुपे म्हणजे आणि या अनुभवाचं २६० निवडक अंतर्नाद यथार्थ चित्रण करण्याची क्षमताही त्यांच्यात आहे", असं डॉ. यादवांनी मला सांगितलं. आता ठरवलं, की तुपेंना प्रत्यक्षात भेटायचं, त्यांचा घरचा माहीत नसल्यामुळे त्यांच्या ऑफिसात, पुणे पुरालेखागारमध्ये, (Department of Archeology) गेलो. पत्ता ऑफिसात बाहेरच्या गॅलरीत एक गृहस्थ झाडू हातात घेऊन ऐतिहासिक कागदपत्रांच्या गट्ट्यांवरची धूळ झाडीत होते. "मला उत्तम बंडू तुपेंना भेटायचं आहे !” मी म्हटलं, त्या गृहस्थांनी झाडू खाली ठेवला आणि मला नमस्कार करत म्हणाले, "मीच तुपे, बोला!” मला आश्चर्याचा धक्का बसला. "एका प्रख्यात इंग्रजी मासिकातील लेखाकरिता आपल्याशी काही बोलायचं आहे.” "आपण इथेच बाकावर बसा मी जरा आत जाऊन आमच्या साहेबांना विचारून येतो. " विश्वास बसेना! मनात विचार आला, खरंच का ३२ कादंबऱ्या लिहिणारा हा लेखक असावा? (३२ हा तुपेंनी मला सांगितलेला आकडा. रीडर्स डायजेस्टच्या संपादकांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वगैरे अधिकृत संस्थांकडे स्वतंत्ररीत्या याची चौकशी करून तुपेंच्या पुस्तकांची यादी तयारी केली. त्यांना काही ३२ नावं सापडली नाहीत. प्रत्यक्ष लेखात त्यांनी स्वतः खात्री केलेली माहितीच वापरली.) पण मग