पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लगेच वाटलं रीडर्स डायजेस्टने यांच्यावर रीसर्च मटिरीयल गोळा करायला सांगितले आहे त्याअर्थी नक्कीच यांच्यात काहीतरी विशेष असलं पाहिजे! हातात झाडू असूनही हा माणूस वेगळ्याच सभ्यतेने वागल्याचं आणि मनमोकळेपणाने बोलल्याचं मला जाणवलं होतं. थोड्या वेळात तुपे परत आले आणि म्हणाले, "आपण सुट्टीच्या दिवशी केव्हातरी आला तर जास्त बरं! आपल्याला सविस्तर बोलता येईल. " मला ते पटलं. त्यांच्या घराचा पत्ता घेतला आणि येणारा सुट्टीचा दिवस, २ ऑक्टोबर १९९३, भेटीसाठी ठरवला. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळी ८ मुळारोड, खडकी, पुणे ३ येथे टेपरेकॉर्डर आणि नोटबुकसह मी पोचलो. - दारातच 'राणा' कुत्रा आणि तुपे माझी वाट पाहात होते. नमस्कार- चमत्कार झाल्यावर तुपे बोलू लागले. 'राणा'ने जणू सगळं उमजून माझ्यावर भुंकण्याचं थांबवलं आणि शेपूट हालवत मला त्या घरात स्वीकारलं! तुपे यांच्या पत्नी सौ. जिजाबाई तेथेच होत्या. थोड्या मोठ्या आवाजातच तुपे बोलत होते. घर ऐन रहदारीच्या रस्त्यावर... येणारे जाणारे, फेरीवाले, वाहने सारखी ये जा करत होती. सारखा आरडोओरडा चालला होता. तुपे यांचं 'घर' म्हणजे १६ बाय १६ ची मुळारोड झोपडपट्टीतली एक खोली आहे. स्वच्छ, नीटनेटकी ठेवलेली. तुपे यांचा परिवार लहानच - सौ. जिजाबाई, चि. विनोद (वय २४ वर्ष), चि. मिलिंद (वय १८ वर्ष) आणि अर्थात पाळलेला कुत्रा 'राणा' (वय १४ वर्ष ) ! रीडर्स डायजेस्टनी दिलेल्या प्रश्नावली प्रमाणे प्रश्नोत्तरं सुरू झाली. तुपे म्हणाले, "आमचं मूळ गाव एनकुल, तालुका खटाव, सातारा जिल्हा. भावंडांत मी सगळ्यात लहान, मला चार बहिणी आणि दोन भाऊ... माझ्या संपूर्ण कुटुंबात मीच एक शिकलेला. तोही तिसरीपर्यंतच माझी बायको अगदी निरक्षर, अंगुठेबहाद्दरच आहे... मातंग समाजातील असल्याने विदारक अनुभव माझ्या पदरी पडले..." जातीपातींच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचं नुकसान सगळ्यांनाच भोगावं लागतं. पण असं कोणीच मनापासून म्हणत नाही, की माणुसकी हीच सर्वश्रेष्ठ जात आहे आणि माणुसकी हाच खरा धर्म आहे. म्हणून मला लिहावंसं वाटतं. मी जास्त करून • सामाजिक आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर लिहितो.” "तुम्ही लिहिता कशाकरिता?” माझ्याजवळ अनुभवांचा साठा आहे आणि माझ्या भाषेत हे अनुभव व्यक्त करण्याची क्षमता आहे. खूप सुचलं की ते लिहिल्याविना चैन पडत नाही! माझ्या मते आज आपला समाज मला रविदासचे गंगेकाठी उच्चारलेलं पद आठवलं - "जाति जात में जात है, ज्यों केलनके पात | रविदास न मानुष जुड़ सकें, ज्यों लौं जात न जात ॥” तुपेंची व्यथा मला पटली, रीडर्स डायजेस्ट हे जगातील सर्वांत यशस्वी मासिक समजले जाते. दरमहा त्याच्या सुमारे दोन कोटी सत्तर लाख प्रती खपतात. भारतात त्याचा खप सुमारे चार लाख तर महाराष्ट्रात सुमारे ९०,००० आहे. डेविट आणि लीला वॉलास या जोडप्याने फेब्रुवारी १९२२ मध्ये भाड्याच्या गॅरेजमध्ये कुठच्याही सहकाऱ्याविना फक्त ३०० डॉलर्स भांडवलावर (तेही भावाकडून डेविटने उसने आणले होते आणि केवळ पहिला अंक काढायलाच ही रक्कम पुरेशी होती) सुरू केलेले हे मासिक म्हणजे प्रकाशनक्षेत्रातील एक चमत्कार गणला जातो. "लिखाणाकडे तुम्ही वळलात कधी?" मी विचारलं, "माझा पिंड हा लावणीकाराचा आहे. माझ्या काही हितचिंतकांनी मला माझे विचार कथारूपाने लिहिण्यास प्रोत्साहित केले आणि मी माझा पहिला लेख 'हुंडा' कथारूपात लिहिला. ही कथा गाजली आणि साहित्य परिषदेचे मला रु. ५०१/- चं पारितोषिक १९७५ मध्ये मिळालं. फार बरं वाटलं. मुख्य म्हणजे लिहिल्यामुळे पैसेही मिळतात आणि नावपण होतं हे मला जाणवलं. आणि मी लिहित गेलो. मला सांगण्यात आलं की, "आता तू मोठं काहीतरी लिहायला घे... तुझं आत्मचरित्र लिही." मी लिहिण्यास सुरुवात केली. १९८१ मध्ये ते पूर्ण केले. (काट्यांवरची पोटं) आमचा, दहा बोलक्या आणि सात मुक्या जनावरांचा परिवार, घरात भाकरीची ओढाताण आणि त्यासाठी सगळ्यांना कामवार करावंच लागे. सगळ्यांचीच काट्यांवरची पोटं उपासमारीतून निर्माण झालं माझं पहिलं काट्यांवरची पोटं हे आत्मनिवेदन, " पुढच्या महिन्याभरात तुपेंशी नंतर अशाच आणखीन तीन-चार भेटी झाल्यानंतर, दि. १३ नोव्हेंबर १९९३ला मी छानपैकी नऊ पानी लेख (त्याच्या सगळ्या प्रश्नांचं सविस्तर उत्तर असणारा ) आणि त्याचबरोबर, तुपेलिखित १२ पुस्तकांच्या कव्हर्सच्या झेरॉक्स प्रती, तुपेंची पाच छायाचित्रं आणि तुपेंना मिळालेल्या पारितोषकांची यादी रीडर्स डायजेस्टला पाठवून दिली. "Uttam Bandu Tupe - A flower from Cactus" असं त्या लेखाचं शीर्षक होतं. लगेच २१ नोव्हेंबर १९९३ला त्यांचं दुसरं पत्र आलं. “I showed your article to one of our editors and she feels he (Tupe) does qualify for our Heros ' section. But I want some more information... Next week I will send you my (some more ) querries." निवडक अंतर्नाद २६१