रीडर्स डायजेस्टसाठी लिहिताना... प्रेम वैद्य या मासिकासाठी लिहिणं हा एक बहुमान तर आहेच, पण शिवाय खूप शिकवणारा एक अनुभवही आहे. भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनमधील एक निमति प्रेम वैद्य यांचा Peon Novelist हा दीड पानी लेख रीडर्स डायजेस्टच्या ऑगस्ट १९९५ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या लेखाची ही आगळीवेगळी जन्मकथा. ऑक्टोबर ३, १९९३ची गोष्ट. रीडर्स डायजेस्टच्या मुंबई कार्यालयातून मला एक पत्र आलं. 'Please collect some research material on Marathi writer Uttam Bandu Tupe...' "उत्तम बंडू तुपे या मराठी लेखकावर आम्हाला रिसर्च मटिरिअल हवे आहे. त्यांच्याबद्दल मिळवू शकाल तेवढी माहिती मिळवा. ज्यामुळे त्यांना लेखनाची प्रेरणा मिळाली असे त्यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांच्या मित्रमंडळींतील त्यांचे स्थान वगैरेंची माहिती आम्हाला हवी आहे. त्यांचे interviews रेकॉर्ड करावे. त्या रेकॉर्डेड कॅसेट्स आम्हाला पाठवाव्यात. आमचे काही मुद्दे : १) तुपेंचे physical description आणि त्यांचे वय. २) ते का लिहितात आणि त्यांनी लिखाणास सुरुवात केव्हा केली? ४) त्यांच्यासमोर कुठल्या अडचणी उभ्या राहिल्या ? त्यांच्या ऑफिसमधल्या लोकांनी त्यांची पुस्तके वाचलीत का? तुपेंशी असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या वर्तनात तुपे लेखक बनल्यावर काही फरक पडला का? अशा काही कारणांमुळे मला अधूनमधून रीडर्स डायजेस्टकडून पत्रं येत असत. त्यांना काही माहिती हवी असेल व मी ती गोळा करू शकेन असं त्यांना वाटलं तर ते मला पत्राने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेविषयी (Bhandarkar Institute of Oriental Research ) व कळवत. ३) त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना लेखनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला का? त्यांची लेखन करण्याची जिद्द कशामुळे पुण्यातील दुर्मिळ नाणी (Coins) या विषयांवर बरंच मटिरिअल टिकून आहे? मी त्यांना गोळा करून दिलं होतं. त्याचे त्यांनी त्यांच्या व्यावसायिक नीतीला अनुसरून मला पैसेही दिले होते. पण त्या माहितीच्या आधारे कुठलाच लेख प्रत्यक्षात रीडर्स डायजेस्टमध्ये • प्रसिद्ध झाला नव्हता, ५) तुपेंना पारितोषिके मिळत गेली त्यावेळी त्यांच्या ऑफिसमधल्या लोकांच्या वागण्यात काही फरक तुपेंना जाणवला का ? ६) तुपेंचे लेखनाचे विषय कोणते? त्यांना लेखनाकरिता कोण मदत करतं? पाठवावी ही माहिती आमच्या 'Heros For Today' या सदराकरता हवी आहे. " ७) त्यांची पुस्तके कोणी प्रसिद्ध केली? तुपे सरकारी ऑफिसमध्ये चतुर्थ श्रेणीचे काम करतात हे समजल्यावर प्रकाशकांनी त्यांची मानहानी केली का? या सर्व प्रश्नांची माहिती आपण सविस्तर गोळा करून सुमारे दहा वर्षांपूर्वी मी रीडर्स डायजेस्टकरता लिहायचा मोठ्या जिद्दीने प्रयत्न केला होता. खूप मेहनत घेऊन मी लिहिलेले दोन्ही लेख त्यांच्याकडून साभार परत आले होते. परंतु त्या संदर्भात मला त्यांच्याशी ओळख करून घ्यायची संधी मिळाली होती. माझा मुलगा अभय टाईम्स ऑफ इंडियाचा प्रतिनिधी म्हणून वॉशिंग्टनला त्यावेळी काम करत होता. त्याची व माझ्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलीची रीडर्स डायजेस्टच्या मुंबई कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांशी ओळख होती. उत्तम बंडू तुपेंवरती काही लेख रीडर्स डायजेस्टच्या संपादकांच्या वाचनात आले होते. हा विषय रीडर्स डायजेस्टकरता त्यांना योग्य वाटला होता. परंतु प्रसिद्ध झालेल्या लेखांपैकी एक लेख त्यांना पुनर्मुद्रित करण्याजोगा वाटला नव्हता. इतरत्र पूर्वी प्रकाशित झालेलं साहित्यच निवडायचं व त्यावर संस्कार करून, त्याचं अनेक वेळा पुनर्लेखन करून, तेच मग छापायचं हे नेहमीचं रीडर्स डायजेस्टचं धोरण असतं. अगदी क्वचित प्रसंगीच ते एखादा लेख मुद्दाम कमिशन करून लिहून घेतात. यावेळी तुपेंवरती लेख लिहून घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळेच या वेळचं त्यांचं पत्र सविस्तर व नेमकं होतं. साहजिकच माझ्या आशा पल्लवित झाल्या. निवडक अंतर्नाद २५९
पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६०
Appearance