पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झालेला, लेखकाचा आत्मसन्मान! ह्या तीन गोष्टींसाठी आणि साहित्यातल्या वैविध्यासाठी मराठी रसिकांनी आप्पांना नेहमीच आठवणीत ठेवलं आहे. १९४९ पर्यंत नोकरी सांभाळून आणि नंतर पूर्ण वेळाचा लेखन, व्याख्यानं, संपादन, प्रकाशन, वितरण हा प्रचंड डोलारा त्यांनी कसा सांभाळला असेल? ह्याची गुरुकिल्ली त्यांच्या अतिशय काटेकोरपणे पाळल्या गेलेल्या कामाबद्दलच्या शिस्तीत आणि साहित्याबद्दलच्या समर्पित वृत्तीत सापडते. फालतू गावगप्पांचे अड्डे जमवणं किंवा स्वतःच्या चाहत्यांचे 'दरबार' भरवणं त्यांनी कटाक्षानं टाळलं. त्यासाठी त्यांचा कोकणस्थी फटकळपणा उपयोगी पडला असावा. लिहिण्याच्या वेळात कोणी भेटायला आलं, की ते अस्वस्थ होत. पाच-दहा मिनिटं बोलत आणि सडेतोड शब्दांत पाहुण्यांना सांगत, 'आता माझं काम चालू आहे. तुम्ही परत कधी तरी या.' असं झालं की ताईची धावपळ सुरू होई आणि आलेल्या पाहुण्यांचं यथायोग्य आदरातिथ्य करून ती त्यांना निरोप देई. ह्या त्यांच्या वागण्यामुळे ते गर्विष्ठ आहेत, माणूसघाणे आहेत असा साधारण समज झाला होता. पण त्यांनी तसं केलं नसतं, तर त्यांची एवढी प्रचंड साहित्यनिर्मिती होऊच शकली नसती. ह्या व्यंकटेश माडगूळकरांच्या चित्रे आणि चरित्रे' पुस्तकात पु. भा. भाव्यांवर 'पुरुषोत्तम भास्कर भावे : एक स्पार्टन योद्धा' हा अतिशय वाचनीय लेख आहे. त्यात त्यांनी वर्णन केलेला एक प्रसंग वरील संदर्भात वाचण्यासारखा आहे. माडगूळकर लिहितात 'बावन्न साल रख्ख उन्हाची वेळ अशावेळी भावे जिमखान्यावर माझ्याकडे माझ्या घरी आले. थोड वेळ बसल्यावर म्हणाले, "व्यंकटराव, अप्पाराव फडके इथंच राहतात, म्हणे?" "हो पलीकडंच... भांडारकर रोडला. " "जाऊ या का त्यांच्याकडे सहज ?" माझी आणि आप्पासाहेबांची तेव्हा तशी ओळखदेख नव्हती. म्हणालो, "आपण आधी कळवलं नाही. शिवाय भर दुपार आहे.” "जाऊ या. नाही भेटले तर परत येऊ.” लांबलचक असं घर, ह्या टोकाच्या दारातून डोकावून भावे ओरडले, "आहेत का?” त्या पलीकडच्या खोलीतून आप्पासाहेबांचा आवाज, "कोण आहे?” "मी भावे. येऊ का?” "या, या." आप्पासाहेबांचं लिहिणं चालू होतं. त्यांच्या टेबलासमोरच्या लांबड्या कोचावर बसलो. "काय चाललंय?" २३४ निवडक अंतर्नाद "लिहितोय.” "रोज किती तास लिहिता?” "चालू असतं सारखं." “फार लिहिलं की कस राहात नाही. सुमार लिहून होतं असं वाटत नाही का ?" “तुम्ही थोडं लिहिता आणि ग्लोरिफाय करता.” "तुमच्या पहिल्या कादंबऱ्या उत्तम आहेत. हल्लीच्या नाहीत. " "माझं उलटं मत आहे. आताचं माझं लेखन जास्ती मॅच्युअर आहे. पूर्वीचं चांगलंच होतं. आताचंही आहे.” थोडा वेळ शांतता, पण ताणलेली लेखनात व्यत्यय आला म्हणून आप्पासाहेब अस्वस्थ आहेत असं वाटलं. भावे एकदम विचारतात, "तुम्ही फार मेथॉडिकल आणि स्ट्रिक्ट आहात असं म्हणतात. खरं का?" आप्पासाहेब लिहिलेल्या कागदांकडे दृष्टी टाकून म्हणाले, "मेथड आता दिसली. स्ट्रिक्टनेस थोड्या वेळानं दिसेल.” पुन्हा काही क्षण अवघडलेले. भावे - "आता जायचं का?" आप्पासाहेब शांतपणे - "बराय, या.” सभासमारंभात जाण्याविषयीही आप्पा चोखंदळच होते. रत्नागिरीच्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाची कागदपत्रं भरायला ते परिषदेत गेले तेवढेच एरवी ते तिकडे विशेष फिरकत नसत. अध्यक्ष म्हणून रत्नागिरीच्या साहित्यसंमेलनाला आणि खांडेकरांकडे अध्यक्षीय सूत्रं सोपवण्यासाठी सोलापूरला ते गेले. ह्याव्यतिरिक्त क्वचितच ते साहित्यसंमेलनाच्या सर्कशीत अडकले. मात्र मह्यविद्यालयीन किंवा शालेय वाङ्मयविषयक कार्यक्रमांना ते आवर्जून जात. तो त्यांच्यातला जागरूक 'शिक्षक' असावा! संगीत नाटकं, चांगले चित्रपट पाहायला, अगदी मुंबईला जाऊन क्रिकेट मॅच पाहायला ते एका पायावर तयार असत. हे सर्व जे त्यांनी अनुभवलं, ते आपल्या साहित्यातून वाचकांपर्यंत पोचावायचा त्यांच्या सदैव प्रयत्न असायचा. त्यांच्या प्रेमातले काही लोक 'भेटायला येणार' असं त्यांना आधीच कळवत. मग कामाचं नियोजन करून ते अशा व्यक्तींना आवर्जून भेटत. छोटा गंधर्व, जयराम आणि जयमालाबाई, पद्माताई शाळिग्राम, जगन्नाथबुवा पुरोहित हे गायक, दि. ब. देवधर, चंदू बोर्डे, बाळ ज. पंडित असे क्रिकेटर किंवा जयवंत दळवी, शं. ना. नवरे, व. पु. काळे, बाळ कोल्हटकर, कविवर्य बा. भ. बोरकर, वसंत कानेटकर, मधुसुदन कालेलकर असे लेखक त्यांचे फार आवडते मित्र होते. दुसरा अपवाद होता मनोहर बागी, यशवंत पेटकर, यशवंतराव चव्हाण ह्या त्यांच्या लाडक्या विद्यार्थ्यांचा आणि बाबू रांगेवालासारख्या सामान्य पण रसिक व्यक्तींचा. विठ्ठलराव दीक्षित, डॉ. रामराव राहतेकर आणि माणिकलाल परदेशी हे त्यांचे परम मित्र, ते आले की "माझ्या दुकानाच्या फळ्या