पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळत असे. माझ्या शाळेतल्या अभ्यासाच्या पुस्तकात माझ्या वडिलांचे धडे असत, त्यामुळे माझा भाव वाढत असे! त्याहून चांगली गोष्ट म्हणजे माझे आईवडील सतत घरीच असत. आप्पा आमच्याशी कॅरम, पत्ते खेळत. आमच्यासाठी पेटी वाजवत. आम्हांला नाटका सिनेमाला नेत किंवा कँपमध्ये आइसक्रीम खायला नेत. कुठेही गेलं की माझी ओळख ना. सीं. ची मुलगी अशीच होत असे. अजूनही तशीच होते आणि त्याचा मला फार अभिमान वाटतो - गर्व नाही ! ताईही 'श्यामची आई' पेक्षा अगदी वेगळी आई होती, केस कापलेली, इंग्रजी लिहिता वाचता येणारी, बांगड्या मंगळसूत्र न घालणारी आणि साहित्याच्या जगात रमणारी माझी ताई सुगरण, कुटुंबदक्ष आई होती. ही गोष्ट ६० वर्षांपूर्वीची आहे हे लक्षात घ्यायला हवं. आमच्या घरातलं वातावरणही खूप वेगळं होतं. घरात मराठी, इंग्रजी नव्या जुन्या पुस्तकांची आणि नियतकालिकांची रेलचेल होती. रोहिणीला आणि मला कथ्थक नृत्य शिकवायला पवार मास्तर घरी येत. अनंतराव रानडे पेटीवर आणि माझा मावसभाऊ चंदू व्हायोलिनवर अशी आमची साग्रसंगीत तालीम व्हायची. मी पाच वर्षांची असताना काही काळ मला साक्षात हिराबाई बडोदेकरांनी गाणं शिकवलं. कारण त्या आप्पांना भाऊ मानायच्या पुढे मी मोठी झाल्यावरही हिराबाईंच्या भगिनी गुलुताई, भाऊराव टेंबे, केशवराव भोळे, जयमाला शिलेदार ह्यांनी वेळोवेळी शिकवलं ते आप्पांमुळेच, दौलतमधे राहायला गेल्यावर भारत गायन समाजाचे भोपे गुरुजी मला गाणं शिकवू लागले. विजय क्रिकेट खेळू लागला. आप्पा त्याला टेस्ट मॅच दाखवायला मुंबईला घेऊन जात. तो नंतर जेव्हा अॅकॉर्डियन वाजवू लागला तेव्हा बीटल्सची गाणी घरात वाजू लागली. आप्पांनी ती आवडीनं ऐकली. रोहिणीला शिवणकला आवडायची, तर तिला शिवण शिकवायला मगर बाई घरी यायच्या. मी कविता लिहू लागले. पी. डी. ए. मधे नाटकांत काम करू लागले. सांगायचं तात्पर्य म्हणजे, अतिशय कलाप्रिय वातावरणात स्वतःच्या आवडीनुसार आम्ही वाढलो. त्या आर्थिक तंगीच्या काळात आमच्यासाठी हे सगळं करताना दोघांना किती धडपड करावी लागली असेल... पण त्याचा उल्लेखड़ी कधी झाला नाही. आप्पा-ताई दोघांनी आमच्यावर कधीच काही लादलं नाही. अगदी शाळेचा अभ्यासदेखील नाही. आप्पा कोल्हापूरहून पुण्याला आले त्या आधीच १९५० मधे झंकार साप्ताहिक बंद झालं ह्येतं. नोकरीही नव्हती. तेव्हा चरितार्थासाठी आपण एक प्रकाशन संस्था काढावी आणि स्वतः ची काही पुस्तकं आणि एखादं नियतकालिक सुरू करून त्यांचं प्रकाशन आणि वितरण व्यवस्था ह्या संस्थेतर्फे केली जावी अशी कल्पना त्यांना सुचली. ह्या कल्पनेतून 'अंजलि प्रकाशन' ह्या संस्थेची स्थापना १९५१ साली झाली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, डी व्हॅलेरा, टेरेन्स मॅकस्विनी ह्या त्यांनी लिहिलेल्या चरित्रांचं आणि काही कथासंग्रह, कादंबऱ्या ह्यांचं प्रकाशन आणि वितरण ते करू लागले. त्या जोडीनं 'अंजलि' नावाच्या षण्मासिकाचे वासंतिक आणि दिवाळी असे दोन अंकही निघू लागले. त्या अंकाचं मुख्य आकर्षण अर्थात आप्पांची नवी कादंबरी असायचं. पहिल्या शुभारंभाच्या अंकात 'खेळणी' ही कादंबरी होती. इतर कथा आणि लेखही अत्यंत दर्जेदार असत. 'अंजलि' त्यांनी १९५१ ते १९७८ असं तब्बल सत्तावीस वर्षं चालवलं. वसंत कानेटकर, अरविंद गोखले, व. पु. काळे, शं. ना. नवरे, जयवंत दळवी, आशा भाजेकर, भा. द. खेर असे अनेक लेखक त्यांच्यासाठी लिहीत होते. ह्या पुस्तकांचं संपादन, प्रकाशन आणि वितरण आमच्या घरातूनच व्हायचं. आप्पांची साहित्यनिर्मिती विस्मयकारक होती. १९१२ साली त्यांची 'मेणाचा ठसा' ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. १९१७ मधे 'अल्ला हो अकबर' ही पहिली (आधारित) कादंबरी आणि १९२५ मध्ये 'कुलाब्याची दांडी' ही पहिली स्वतंत्र कादंबरी प्रसिद्ध झाली. तेव्हापासून ते आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत, म्हणजे ६६ वर्षांच्या दीर्घ साहित्यप्रवासात, त्यांनी १९२ ग्रंथांची निर्मिती केली. ७४ कादंबऱ्या, २८ लघुकथासंग्रह, गुजगोष्टींचे १४ संग्रह, २५ वाड्मयीन निबंध प्रबंधांचे ग्रंथ, १५ इंग्रजी पुस्तकं आणि इतर ३६ पुस्तकं असा प्रचंड खजिनाच त्यांनी मराठी वाचकांना दिला, यांतली काही पुस्तकं 'मैलाचा दगड' - अविस्मरणीय ठरली. त्यातले एक म्हणजे १९३१ साली त्यांनी लिहिलेले 'प्रतिभासाधन ' पुस्तक. आप्पांची वाङ्मयीन भूमिका सांगणारा हा ग्रंथ होता. 'साहित्याचं प्रयोजन कोणतं, त्याची प्रतिज्ञा काय आणि त्याचं प्रधान कार्य कोणतं?, असे मूलभूत प्रश्न मांडून 'कलेसाठी का हा सिद्धांत किंवा सौंदर्यवादाची विचारसरणी मांडणारे मराठी साहित्यातले ते प्रणेता ठरले. हा ग्रंथ प्रकाशित झाल्यावर क्लेटन हॅमिल्टनच्या 'Art of fiction' ह्या ग्रंथाचं वाङ्मयचौर्य फडक्यांनी केलं असा आरोप त्यांच्यावर केला गेला. वादावादीचा गदारोळ झाला. एक चौकशी समिती नेमली गेली. त्या समितीनं फडक्यांच्या ग्रंथावर हॅमिल्टनच्या ग्रंथाची घनदाट छाया आहे एवढाच निष्कर्ष काढला आणि हे वादळ शांत झालं. ह्या ग्रंथाच्या अनेक आवृत्या निघाल्या. आजही नवोदित लेखकांसाठी हा ग्रंथ महत्वाचा मानला जातो. ह्याच धाटणीचे 'लघुकथा लेखन : तंत्र आणि मंत्र' आणि 'प्रतिभा विलास' हे ग्रंथही त्यांनी सिद्ध केले. 'मानस मंदिर' ह्या पुस्तकात आधुनिक मानसशास्त्राची मूलभूत तत्त्वं आणि मुख्य पाश्चात्त्य संप्रदायांचे सिद्धान्त आणि त्यांचं विवेचन होतं तर 'आधुनिक गीता म्हणजे विल डयूरंटच्या 'ऑन मीनिंग ऑफ लाइफ' ह्या ग्रंथाचं भाषांतर होतं. जीवनाच्या प्रयोजनासंबंधी विविध नामवंत लोकांना प्रश्रावली पाठवून त्यांची उत्तरं डयूटनं एकत्रित केली होती. र. धों. कर्व्यांसारखं त्या काळात कुटुंबनियोजनावर पुस्तकं लिहून त्या लेखनासाठी दिलगिरी प्रदर्शित न करता, एक ख्रिस्ती मिशनरी संस्था चालवत असलेल्या नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजातल्या नोकरीचा राजीनामा देणारे आप्पा लिहिलेल्या शब्दांसाठी कणखरपणे उभे राहाणारे लेखक म्हणून प्रसिद्ध झाले होते. आप्पांनी मराठी साहित्याला तीन अमूल्य उपहार दिले असं म्हणता येईल. एक म्हणजे सोपी, ओघवती, प्रसन्न भाषा, दोन, गुजगोष्टी किंवा ललित निबंध आणि तीन म्हणजे त्यांनी आग्रह धरून रूढ केलेला, 'मानधन दिलंच पाहिजे' ह्या पद्धतीनं स्थापित निवडक अंतर्नाद २३३