पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दौलत बंगल्यातील दिवाणखान्यात रंगलेला पत्त्यांचा डाव, ८ डिसेंबर १९६९ (डावीकडून) पत्नी कमल, मुलगा विजय, फडके स्वतः व मुलगी गीतांजलि बंद करतो आणि मग निवांत गप्पा करू" असं म्हणून ते काम आवरत, लेखक आणि वक्ता ह्याप्रमाणेच एक जाणकार रसिक म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यामुळे विविध क्षेत्रांतले ख्यातनाम कलावंत त्यांना भेटायला येत. पण ह्या सगळ्यात ते अडकून राहिले नाहीत, पुरस्कार, पदव्या ह्यांच्यामागे ते कधीही धावले नाहीत. म्हणूनच त्यांनी इतकी कसदार साहित्यनिर्मिती केली. आप्पांकडे कोणी मोठे कलावंत आले, की ते मुद्दाम आम्हां मुलांना बोलावून घेत. पाहुण्यांच्या पाया पडायला लावत आणि म्हणत, "बसा इथे चुपचाप, चार चांगले शब्द कानांवर पडू द्या." ह्या मोठ्या कलावंताना पाहणं, त्यांचे विचार ऐकणं हे आमच्यावरचे संस्कारच होते. ललितकलांद्वारा जीवनातला आनंद घेत जगण्याचा आप्पांचा वारसा ह्या संस्कारांमुळेच आम्हांला मिळाला. वारशात अजून एक गोष्ट मला मिळाली, ती म्हणजे त्यांची सुगंधाची आवड. त्यांना सुगंधाची, ताज्या फुलांची, घरभर दरवळणाच्या उदबत्तीच्या सुगंधाची अतिशय आवड होती. एकूणच स्वच्छतेची, टापटिपीची आणि सौंदर्याची आवड त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पुरेपूर दिसून यायची स्वच्छ, शुचिर्भूत, स्नान करूनच ते लिहायला बसायचे. त्यांचं रोजचं स्वच्छ पांढरं धोतर, शर्ट, एवढंच काय, त्यांचा रुमालदेखील ताई इस्त्री करून ठेवायची. ते बाहेर समारंभाला जाताना सूट, रेशमी शर्ट घालायचे. कॉलरलगतचं बटण उघडं ठेवायचे. त्या काळात त्यांच्या इतक्या दिमाखदार व्यक्तिमत्त्वाचा मराठी लेखक बहुतेक नसावा. अंघोळीला म्हैसुर सँडल साबण त्यांना आवडायचा आणि दिवाळीत हमखास 'मोती' साबण असायचा. पात्रा, इव्हनिंग इन पॅरिस, खस, हीना हे त्यांचे आवडते सुगंध चाफा, पिवळा गुलाब, बकुळ, मोगरा ही फुलं त्यांना आवडायची. लिहायच्या टेबलावर एका तबकात नेहमी ही फुलं ठेवलेली असायची. त्यांना खरं तर अस्वच्छ, मलिन असं मी कधीच पाहिलं नाही. रोज दुपारी ते दादी करायचे. त्यावेळी त्यांना पाहायला मला फारच आवडायचं! दर महिन्याला त्यांचे केस कापायला न्हावी घरी यायचा. ताई स्वतः त्यांच्या हाता-पायांच्या बोटांची नखं कापायची. शेवटच्या वर्षात ते खूप थकले, तेव्हा ताई त्यांची दादीपण मन लावून करायची. आणि ते तिला त्याबद्दल शाबासकी द्यायचे! पुढे पुढे सूट घालणं त्यांना नकोसं वाटायचं, तर त्यांचे नवे कोरे सूट त्यांनी त्यांच्या लाडक्या बाबू टांगेवाल्यांना देऊन टाकले. आप्पा थोडं खायचे, पण फार चोखंदळपणे खायचे. त्यांची आवडनिवड लक्षात ठेवून घरात स्वयंपाक व्हायचा. पांढरेशुभ्र उकडीचे मोदक, भरली वांगी, वालाचं बिरडं, टोमॅटोचं सार, आळूवड्या हे त्यांचे आवडते पदार्थ होते. आप्पा सकाळी उशिरा उठायचे. आठ वाजायच्या सुमारास त्यांचा चहा तयार झाला, की त्यांना उठवायचं काम आम्हां मुलांपैकी कोणा एकाचं असायचं. सकाळी दोन कप चहा प्यायचे. पण चहा अगदी ताजा आणि गरम लागायचा. चहा झाला की स्नान करून, तयार होऊन, नऊ वाजता आप्पा लिहिण्याच्या खोलीत जायचे, लेखनिक वाटच पाहात असे. न विचारता न पाहाता आदल्या दिवशी थांबले असतील त्या वाक्याच्या पुढच्या वाक्यापासून आप्पांचं डिक्टेशन सुरू होई! त्यांच्या मनात सर्व काही आधीच तयार असे. प्रत्येक कादंबरीच्या आधी भरपूर 'होम वर्क करून त्या कादंबरीचा पूर्ण आराखडा आप्पा तयार करत. पात्रं, त्यांची वयं, व्यवसाय, जन्म इत्यादी तपशील सगळं ठरलेलं असे. कामातली त्यांची ही शिस्त, नेमकेपणा मी इतर कुणात पाहिला नाही. दहा-साडेदहाला एक कप दूध आणि हलका नाश्ता करायचे, टोस्ट आणि स्क्रॅम्बल्ड अंडं त्यांना विशेष आवडायचं. मग परत काम सुरू, बारा- साडेबाराला काम संपवून लेखनिक घरी जायचा. आप्पा जेवायला यायचे. दुपारी विश्रांती, निवडक अंतर्नाद २३५