पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या आहे. प्रत्येकात वेगळा स्वतंत्र प्राण ओतलेला आहे. हे गोखल्यांना जमले ते त्यांच्या या माणसांकडे पाहण्याच्या अनपेक्षित दृष्टिकोनामुळे, या माणसांच्या जीवनातील आणि व्यक्तित्वातील चमत्कृती शोधून काढण्याच्या हव्यासामुळे आणि अखेरीला वेगवेगळ्या प्रसंगांत सापडलेल्या या माणसांशी समरस होण्याच्या त्यांच्या अमर्याद शक्तीमुळे. या शक्तीमुळेच त्यांच्या कथेतील या सर्व व्यक्ती, ही सर्व माणसे इतकी वेगवेगळी, वैयक्तिक आणि चित्र विचित्र स्वरूपात प्रकटली आहेत, की त्यामुळे गोखल्यांच्या कथेला एक खरीखुरी आणि अंतर्बाह्य विविधता आणि वैचित्र्य लाभले आहे. या अंतर्बाह्य विविधतेमुळेच गोखल्यांच्या कथेला कुठलेही तंत्र नाही, कुठलीही शैली नाही. तंत्राच्या आणि शैलीच्या ठरावीक चाकोरीत ती बसूच शकत नाही. 'Style is the man' असे म्हटले जाते. ते खरे असेल किंवा नसेल; पण 'Style is not an author'. कारण स्टाइल म्हणजे अखेरीला साचा, स्टाइल म्हणजे बंधने, स्टाइल म्हणजे मर्यादा, गोखल्यांच्या कथेमध्ये इतकी विविधता आहे की ती शैलीच्या बंधनात अडकूच शकत नाही. शैलीचे जोखड तिला मानवणेच शक्य नाही. कारण त्यांच्या प्रत्येक कथेची शैली वेगळी, अभिव्यक्ती वेगळी आहे. ती स्वतंत्र, स्वयंभू आणि आशयानुरूप आहे. कथेतल्या अनुभवातून ती निर्माण झाली आहे, इतकेच नव्हे तर त्या अनुभवाशी ती एकजीव झाली आहे. अंगाला, शरीराला जसे कातडे चिकटलेले असते तशी त्यांच्या कथेची अभिव्यक्ती आशयाला चिकटलेली असते. म्हणून त्यांची कथा वाचताना त्यांची शैली स्वतंत्रपणे जाणवत नाही. कारण तिचे अस्तित्व आशयापासून अभिन्न आहे गोखल्यांची कथा जशी तंत्राच्या, शैलीच्या बंधनात अडकलेली नाही तशी ती आशयाच्या अनुभवाच्या बंधनातही अडकलेली नाही. 'अनामिका' मध्ये वेश्यांच्या जीवनातल्या सुखदुःखांवर त्यांनी कथा लिहिल्या आहेत. 'मंत्रमुग्धा' मध्ये लेखकांचे, कलावंतांचे एक वेगळे भावविश्व त्यांनी रंगविले आहे. आणि 'मुसळधार' या संग्रह्मत त्यांनी त्यांच्या कथांच्या जन्मकहाण्या सांगितल्या आहेत. म्हणजे मानवी जीवनातला कुठलाही अनुभव त्यांच्या कथेला वर्ज्य नाही. इतकेच नव्हे तर अमानवी जीवनातल्या अनुभवांनाही त्यांची कथा सामोरी गेली आहे. 'के' या कथेत त्यांनी कोकिळेच्या भावमधुर अशा प्रणयाचे चित्रण केलेले आहे. वासरांच्या आठवणीने आक्रंदन करणाऱ्या म्हशीचे चित्रण 'पारू' या त्यांच्या कथेत आहे आणि 'माहेर' ही तर एका भिंतीवरच्या वेलीचे काव्यात्म चित्रण करणारी कथा आहे. गोखले या सर्व प्रकारच्या कथा उत्कटपणे, समरसतेने लिहू शकले, कारण ते एक स्वतंत्र, उन्मुक्त आणि स्वच्छंद कथाकार होते. इतिहासाची, संस्कृतीची, सामाजिकतेची, वाड्मयीन संकेतांची किंबहुना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची आणि प्रतिभेचीदेखील बंधने त्यांच्या कथेवर पडली नव्हती. त्यामुळेच त्यांची कथा स्वयंभू वेगळेपणाने मराठी साहित्यात उठून दिसते. मराठी कथेच्या अत्युच्च शिखरावरील तिचे स्थान अढळ आहे. २२२ • निवडक अंतर्नाद गोखले १९९२ साली काहीसे अचानकपणे वारले. त्यावेळी त्यांचे वय ७३ वर्षांचे होते. म्हणजे आजकालच्या मानाने फार नाही. पण मुंबईहून पुण्याला बसने येताना वाटेत ते कुठेतरी पडले, त्यातून उद्भवलेल्या दुखण्यातून ते सावरले नाहीत, असे मला कळले. त्यांना रूबी नर्सिंग होममध्ये मी भेटायला गेलो होतो. पाच-दहा मिनिटे मी त्यांच्या खोलीत होतो. पण ते माझ्याशी काही बोलले नाहीत. कदाचित ते बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. आमच्यात संवाद घडला नाही. त्यांनी क्षीण हास्य करीत माझ्याकडे बघितले. त्यांची नजर काय सांगत होती, हे मला उमजले नाही. निःशब्द नजरभेट घेऊन मी निघालो. दुसऱ्या दिवशीच गोखले गेल्याची बातमी आली. त्यांनी अबोल निरोप घेतला होता. निदान माझातरी, (अरविंद गोखले, १९१९-१९९२) (दिवाळी २०१५) अंतनाद नोव्हेंबर-डिसेंबर २०१४ विवाळी विशेषांक रुपये २०० सांस्कृतिक समृद्धीसाठी दिवाळी २०१४ (चित्रकार नेत्रा साठे)