पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अरविंद गोखले : कथा एके कथा राजेन्द्र बट्टी 'परमनप्रवेशाची किमया लाभलेला लेखक' असे ज्याच्याविषयी म्हटले जाते, ज्याने आयुष्यभर कथा हा फक्त एकच साहित्यप्रकार हाताळला आणि तरीही साहित्यजगतात खूप मोठे स्थान प्राप्त केले अशा मराठी नवकथेच्या एका प्रवर्तकाविषयी. पन्नास साठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. १९६०-६२च्या सुमाराची. त्यावेळी मी सुविचार प्रकाशन मंडळ' या प्रकाशनसंस्थेचा संचालक म्हणून काम पाहत होतो. आमचे कार्यालय टिळक रस्त्यावर होते, अजूनही आहे मला आठवते, १९६१ साली 'विघ्नहतीं हा अरविंद गोखले यांचा कथासंग्रह आम्ही प्रकाशित केला. त्याच्या प्रती तयार झाल्यावर मी एके दिवशी दुपारी गोखल्यांना दूरध्वनी केला. "प्रती पाठवून देतो. घरी आहात ना?" "पाठवू नका. मीच संध्याकाळी येईन घेऊन जाईन." संध्याकाळी गोखले आले. गौर वर्ण, मध्यम उंची, चौकोनी, देखणा चेहरा, काहीसा गंभीर, पण डोळ्यात मिस्किल, हसरी झाक. परीटघडीची पँट, त्यात खोचलेला शुभ्र, सफेद हाफशर्ट, आत येता येता त्यांनी त्यांच्या मृदू, मऊसर खर्जातल्या आवाजात दबकत मंद पुकारा केला. "ग्रेटेस्ट स्टोरीरायटर ऑफ टिळक रोड यांनी आत यावे काय?" गोखले समोर येऊन बसले. 'विघ्नहर्ती' च्या प्रती टेबलावरच होत्या. मी त्या गोखल्यांना दिल्या. एक प्रत हातात घेऊन त्यांनी चाळली नि बाजूला ठेवली. पुस्तकाबद्दल, ते कसे झाले आहे, याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. हलकेसे हसत त्यांनी माझ्याकडे बघितले म्हणाले, "आपण सेलिब्रेट करू या." "सेलिब्रेट?” "अहो, हे विघ्नहर्ती सेलिब्रेट करू, " "म्हणजे?” मी कोड्यात तसा प्रकाशनक्षेत्रात मी तेव्हा नवखा होतो. "आनंदोत्सव.” मी त्यावर काही बोललो नाही. मग त्यांनी थोडे पुढे झुकत विचारले, "तुम्ही ड्रिंक घेता ना?" “ड्रिंक?" मी पुन्हा दुग्ध्यात. “ड्रिंक वगैरे घेता की नाही?" "घेतो ना." "कुठले, काही स्पेशल चॉईस?" "स्पेशल काही नाही, आपलं गोल्डस्पॉट घेतो.” त्यावेळी गोल्डस्पॉटचा जमाना होता, थम्स अप, कोक, पेप्सी यांचा उदय व्हायचा होता. "अहो, ते ड्रिंक नाही.” गोखले हसले नाहीत. सोशिक शब्दांत बोलले. "मग?" "ड्रिंक म्हणजे दारू," गोखल्यांचे शब्द सहज होते. "दारू?" दारू हा शब्द माझ्या कोशात नव्हता. निदान तोपर्यंत तरी. तो ऐकताच अंगावर नकळत थरार उठला. डोळ्यासमोर 'एकच प्याला'तली सुधाकर, तळीराम वगैरे मंडळी तरळून गेली असणार, गोखल्यांनी तो विषय वाढविला नाही. पुस्तकाच्या प्रती काखोटीला मारून ते उठले. "संध्याकाळी या सातला. वाट बघतो.” गोखले त्यावेळी ना. सी. फडके यांच्या 'दौलत' बंगल्याच्या तिरपे समोर विजयानगर कॉलनीत राहत होते. मी त्यांच्या घरी पहिल्यांदाच जात होतो. मी बिचकू नये, संकोच करू नये म्हणून असेल कदाचित, त्यांनी माझे स्नेही वि. शं. पारगावकर यांनाही बोलावले होते. पारगावकरांबरोबर मी संध्याकाळी त्यांच्या घरी पोचलो तेव्हा उरात नाही म्हटले तरी थोडी धाकधूक होती. पण आत जाताच गोखल्यांनी सहजपणे गोल्डस्पॉटची बाटली माझ्यासमोर ठेवली. "हे घ्या तुमचे ड्रिंक. " गप्पा सुरू झाल्या. गोखले तसे फारसे बोलके नव्हते. बोलत होते ते बरेचसे पारगावकर अधूनमधून मी पण जरा वेळाने गोखले खुलले. त्यांच्या हळुवार, हलक्या सुरात गुफ्तगु करावी तशा लेखकांच्या, प्रकाशकांच्या गमतीजमती सांगू लागले. मध्येच एखादी कथा कशी सुचली, ती हकीकतही त्यांच्या तोंडून बाहेर निवडक अंतर्नाद २१९