पान:निवडक अंतर्नाद.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक, आर्थिक वस्तुस्थितीला कोणी एक विचारवंत समजून घेऊन काही अजेंडा मांडू शकेल हे शक्य नव्हतं. विनोबांच्या भूदानाचा बोजवारा उडाल्यावर सर्वांना समावेशक भूमिकेतून एकत्र येण्याची निकड वाटू लागली, महाराष्ट्र पातळीवर काँग्रेस वगळता सर्व मंडळींना 'माणूस' आपला वाटला आणि तुमचं विलोभनीय नेटवर्क उभं राहिलं. पण माजगावकर, सातपुड्यातल्या आदिवासींना मध्यमवर्गीय घरात नेऊन ठेवण्याची महत्त्वाकांक्षा मुळातच फार तोकडी होती हे तुमच्या लक्षात आलं तेव्हा गाडं फार पुढे निघून गेलं. उत्तरार्धामध्ये तुम्ही 'माणूस' चालवत नव्हता, 'माणूस' तुम्हाला खेचून नेत होता? वार्तांकन/लेखमाला पुरेनात म्हणून तुम्ही स्वतः एकेकाळी रस्त्यावर उतरलाही होता. वेरूळ ते मुंबई अशी पायपीटही केली होती. तिला फार मोठा प्रतिसाद मिळणार नव्हताच कोणत्याही अत्यंत अभिनव कल्पनेकडे सुरुवातीला दुर्लक्ष तंच, हे तुम्हांला कुणी सांगायची गरज नव्हती. रस्त्यावर उतरलेले मध्यमवर्गीय अजेंड्याकडे वळलात ? एकदा तुम्ही परत का अजेंडा आपण मांडायला हवा होता! हे काम अवघड होतंच; पण नुसतं 'माणूस' चालवणं तरी सोपं कुठे होतं! 'निवडक माणूस' मध्ये तुमच्या एका जिवलग मित्राच्या लेखात असा उल्लेख आहे की पु. ग. सहस्रबुद्धे यांचं अभ्यासमंडळ नसतं तर आपण दोघं कुठे असतो, असं तुम्ही म्हटलं होतं. माजगावकर, हे अभ्यासमंडळ फार फसवं असतं. त्यातच पुगंसारखा खंदा सांगोपांग चर्चा करणारा प्रमुख असला तर अभ्यास नावाची गोष्ट कधी संपतच नाही. आपण प्रश्नांचा अभ्यास करतो आहोत हेच आपलं योगदान आहे असा भ्रमही निर्माण होतो. एका प्रश्नाचा अभ्यास करून काही उत्तर सापडेपर्यंत एकतर त्या प्रश्नाचं स्वरूप बदललेलं असतं किंवा आणखी एक नवा प्रश्न उभा राहून तुम्हांला अभ्यासासाठी गळाला लावत असतो. कृती मागे पडते, हे लक्षात येईपर्यंत उमेदीची वर्षं संपून जातात. इंग्रजांनी आपल्याला संस्था काढण्याची घातक सवय लावून गैरराजकीय कामात गुंतवून ठेवलं; तर संस्था काढण्याचीही कुवत नसलेल्यांनी अभ्यास मंडळं काढून कृतीचा मार्ग बंद करून यकला. संध्याकाळी संघस्थानावर जाऊन लाठ्या आपटण्याइतकंच आठवड्यातून एक दिवस पार विश्वाच्या उत्पत्ती - विनाशाची चर्चा करणं फिजूल असतं! आसपासच्या प्रश्नापैकी सर्वात कळीचा प्रश्न ठरवून इथे पुन्हा अती अभ्यासाच्या खाईत पडायची शक्यता असतेच - त्याचं उत्तर शोधून ते जनतेपुढे घेऊन जाण्याचं कृतिशील राजकारण आपण सगळ्यांनीच का टाळलं? लोकशाही प्रक्रिया राबवून, सत्तेला कमी न लेखता, राजकीय ताकद उभी करून विकासाभिमुख राष्ट्रवादाचा २१८ निवडक अंतर्नाद टिळक- गांधी- सावरकर - गोळवलकर जावडेकर - विनोबा- लोहिया - दीनदयाळ - जयप्रकाश हे तुमच्या आधुनिक भारतीय राष्ट्रवादाचे प्रमुख आधार नेहरूंनासुद्धा तुम्ही संघ पार्श्वभूमीचा माणूस क्वचित देईल एवढं श्रेय – भारतासाठी एक भव्य स्वप्न पाहण्याचं - दिलं होतं. मात्र या सगळ्यांची सांगड घालणं अशक्यप्राय होतं, हे तुम्ही विसरलात की नजरेआड केलंत? अशी सर्वसमावेशकता फार लवकर कुंठित होते, तशी ती झालीच ? त्यातच तुम्ही परत एकदा संघपरिवाराकडे आशेने पाहू लागल्यावर हिंदुत्वाचं वावडं असणारी मंडळी आपापल्या तंबूमध्ये परत गेली. 'माणूस'साठी कुणीही काही आर्थिक मदत वगैरे धावपळ केली नाही. उलट काही जण 'हे आम्हांला आधीच माहीत होतं अशी कुत्सित टिप्पणी करत राहिले. पंचवीस वर्ष सगळ्यांना सांभाळून तुम्ही एकटे पडलात. एक उदारमतवादी उपक्रमशील संपादक ही तुमची ओळख छान असली तरी अपूर्ण आहे, नवभारतीय राष्ट्रवादाचा शिल्पकार अशीही तुमची ओळख हवी होती. माजगावकर, हे अभ्यासमंडळ फार फसवं असतं. त्यातच पुगंसारखा खंदा सांगोपांग चर्चा करणारा प्रमुख असला तर अभ्यास नावाची गोष्ट कधी संपतच नाही. आपण प्रश्नांचा अभ्यास करतो आहोत हेच आपलं योगदान आहे असा भ्रमही निर्माण होतो. एका प्रश्नाचा अभ्यास करून काही उत्तर सापडेपर्यंत एकतर त्या प्रश्नाचं स्वरूप बदललेलं असतं किंवा आणखी एक नवा प्रश्न उभा राहून तुम्हांला अभ्यासासाठी गळाला लावत असतो. कृती मागे पडते; हे लक्षात येईपर्यंत उमेदीची वर्षं संपून जातात. आणि माजगावकर, आता तर सातपुड्यातला आदिवासीही बदलला आहे आणि पुण्यामुंबईचा मध्यमवर्गही, मध्यमवर्गीय आता शरीराने इथे राहतात एवढंच मनाने ते भारतीय नाहीत. मी त्यांना 'निवासी अ-भारतीय' म्हणतो. (माझ्या या वाक्प्रचाराला तुम्ही दाद दिली असती!) आदिवासीच नाही तर सगळे अविकसित गट आता हक्काची मागणी करत नाहीत, 'कर्तृत्वाला संधी द्या' म्हणत नाहीत - सगळ्यांना आरक्षण हवं आहे आणि सगळेजण ते द्यायला तयारच आहेत. संपत्ती निर्माण व्हायच्या आधीच (लुटीचे) नवेनवे मार्ग शोधले जाताहेत, काळा पैसा वाढतो आहे, देशाची अर्थव्यवस्था जुन्या नव्याच्या स्किझोफ्रेनियामध्ये सापडली आहे, सुशासनाची प्रवचने रोज घडताहेत, मात्र जीवन अधिकाधिक जिकिरीचं होतं आहे. गळेपडू, गळेकाढू आणि गळेकापू शैली बळावत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कृतिशील, संघर्षशील उदारमतवादी विचारसरणीची कास धरून स्वार्थप्रेरणेला तुच्छ वा अनैतिक न मानता तिला सुसंस्कृत करण्याची निकड जाणवते आहे कधी नव्हे इतकी तुमची आठवण येते आहे... तिच्या वितरणाचे तुमचा, विनय (फेब्रुवारी २०१५)