पान:निवडक अंतर्नाद.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुण्याच्या संघवर्तुळाशी माझा काही धागा नव्हता, मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये रमलो होतो. मळेकरवाडा आणि प्रबोधिनी एकमेकांपासून फार तर दोन हाकांच्या अंतरावर - पण आप्पा पेंडसे आणि 'माणूस' कार यांच्यातलं अंतर कित्येक लाइट वर्षांचं! आप्पांना आधुनिक विवेकानंदप्रणीत हिंदुत्वाचा concentrated डोस निवडक बुद्धिवंतांना द्यायचा होता तर श्रीगमांना हिंदुत्वाचं ब्राह्मणी, शहरी, अभिजनवादी, विषमतेला मान्यता देणारं स्वरूप बदलून त्याला पूर्णपणे बहुजनवादी ग्रामीण चेहरा द्यायचा होता. एवढंच नव्हे तर सामर्थ्याच्या मागे धावण्यापेक्षा सेवाकार्याला महत्त्व देणारं हिंदुत्व त्यांना अभिप्रेत होतं. मग हे दोघे एकाच बिंदूपासून निघाले तरी एकमेकाला भेटणार कसे! म्हणजे मी एकाचा उल्लेख दुसऱ्याकडे करू शकणार नव्हतो. १९६९ च्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तुम्ही 'श्रीकैलास ते सिंधुसागर' असं 'अत्र स्वतंत्रता संचलन केलंत. अजून संघाची भाषा तुमच्या तोंडी होती. 'वेरूळ ते मुंबई पदयात्रा' असे साधे शब्द तुम्हांला सुचले असतीलच पण रुचले नव्हते? या पदयात्रेनंतर दि. बा. मोकाशींनी 'अठरा लक्ष पावलं' हे पुस्तक लिहिलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचणं चांगलंच अवघड असणार, याची खात्री पटली. ती पदयात्रा करत असताना तुम्ही अधूनमधून 'माणूस' मध्ये वार्तापत्रवजा मजकूर पाठवत होता. त्यातला काही मी वाचलाही होता, पण मोकाशींनी मिष्किल तटस्थपणे तुमच्या स्वभावाचं अवघड गणित अत्यंत मार्मिकपणे मांडलं होतं. तुमचा सततचा अस्वस्थ स्वभाव, काहीसा लहरीपणा, सहकाऱ्यांशी संवाद करण्यात सातत्य नसणं, अचानक एखादी भूमिका जाहीर करून सगळ्यांना गोंधळात पाडणं एका गावी फारच घाण दिसली होती, तिथे 'चला सगळे मिळून गाव झाडून स्वच्छ करू या' असं तुम्हांला म्हणता आलं असतं पण तुम्ही कल्पना मांडली ती 'आम्ही पदयात्रावाले गावातली सगळी विष्ठा गोळा करून तिचा लिलाव करणार आहोत' अशी! पदयात्रा चालू असताना मध्येच 'आता श्रीगमा / श्रीभाऊ राजकीय पक्षाची घोषणा करणार या अफवेमुळे उडालेला गोंधळ झालेली धावपळ आणि मध्येच सूक्ष्मात गेल्यासारखा (विनोबांकडून आलेला ?) अबोलपणा; गांधींच्याप्रमाणेच सतत स्वतःच्या आतल्या आवाजा' प्रमाणे चालण्याची वृत्ती आणि एकूणच एकांतप्रियता - हे सगळं वाचल्यावर हा श्रीगमा नावाचा गड सहजासहजी जिंकता येणार नव्हता, हे उघड होतं; संधीची वाट पाहण्याशिवाय दुसरा नव्हता! ती संधी माझ्याकडून निर्माण होणं अशक्य, कारण मी २० वर्षांचा होतो आणि तुम्ही ४० ! - कोंडी फोडणारी पहिली संधी तुम्हीच दिलीत. जानेवारी १९७४ मध्ये तुम्ही समविचारी मित्रांबरोबर 'ग्रामायन' नावाने ग्रामीण विकसनासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि विकासाची वेगवेगळी मॉडेल्स, सिद्धांत मांडणाऱ्या अभ्यासकांना दोन दिवस एकत्र आणलंत! ते दोन दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होते; कारण एव्हाना प्रबोधिनीत आता आपले थोडे दिवस उरलेत हे कळलं होतं; पुढचा रस्ता 'ग्रामायन' मधून सापडणार होता. मुख्य म्हणजे तुमच्यापर्यंत पोचता येणार होतं! महाराष्ट्रभरचे पन्नास-पाऊणशे कार्यकर्ते- २१२ • निवडक अंतर्नाद अभ्यासक तिथे होते मात्र मला इंटरेस्ट मधुकरराव देवल आणि तुम्ही या दोनच माणसांत होता. तुम्ही दोघेही विचारक कार्यकर्ते होता. सगळा मेळावाभर मी तुम्हा दोघांच्या आसपासच घुटमळत होतो. तुमच्या सवयी लकबी बारकाईने पाहत होतो. प्रतिक्रियांना दाद देत होतो. मीही तुमच्या लक्षात राहीन अशी फिल्डिंग लावत होतो. त्यातच तुम्हा दोघांतला फरकही कळला. मधुकरराव कायम शांत, धीरगंभीर आणि चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवून असायचे; तुम्ही मात्र एवढ्यातेवढ्यावरून अस्वस्थ ! कुणी मुद्दा सोडून बोलायला लागला, जास्त वेळ घेतला, चहाच्या/ जेवणाच्या वेळा चुकल्या, की कढईतल्या लाहीसारखी तुमची जागच्या जागी तडतड सुरू असायची! पण माझी चिकाटी वाया गेली नाही. मेळावा संपताना मी मधुदादांकडून म्हैसाळला यायचं आमंत्रण मिळवलं; तुमच्याकडूनही येत जा अधूनमधून ऑफिसात' असा टेम्पररी व्हिसा मिळाला, पासपोर्ट आप्पांनी तयार करून ठेवलाच होता! दुसरी संधी दिली ती इंदिरा गांधींनी; जून ७५ मध्ये देशांतर्गत आणीबाणी जारी करून! मधल्या वर्ष- सव्वावर्षात तुमच्या- माझ्यामध्ये ice-breaking झालं होतं. एक संगीतपरीक्षणही 'माणूस' मध्ये लिहिलं होतं, ज्ञानप्रबोधिनीच्या इमारतीच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाला तुम्ही श्रोत्यांमध्ये होता. 'कव्हरवर आमच्या या इमारतीचा फोटो छापा, मग आतमध्ये तुम्ही प्रबोधिनीवर तुम्हांला हवं ते लिहा' ही माझी स्मार्ट ऑफर तुम्ही हसून सोडून दिली होती. पण त्या हसण्यामध्ये नकार / नापसंती / दुरावा नव्हता. आणीबाणी घोषित होण्यापूर्वीच गुजरातच्या नवनिर्माण आंदोलनाने देश खडबडून जागा झाला होता. त्याच सुमारास पुण्यात जेपींचं भाषण झालं होतं. काहीतरी मोठी उलथापालथ होणार याचे वेध लागले होते. त्यामुळे आपल्या भेटी- चर्चा नियमितपणे होणारच होत्या. कारण मोकळेपणाने बोलणारी माणसं दुर्मिळ होती. इंदिरा गांधींनी ती अनिश्चित अवस्था एका आदेशात संपवली होती. इथून पुढे इंदिरावादी तुरुंगाबाहेर पण गुलामीत असणार होते आणि लोकशाहीवादी तुरुंगात पण स्वतंत्र असणार होते! तुमच्या माझ्या भूमिकेत काहीच फरक नव्हता, सर्व शक्तीनिशी आणीबाणीचा नेटाने विरोध करणं, त्यात बिनडोक घिसाडघाई न करता आपल्या मर्यादित शक्तीचा अधिकाधिक परिणामकारक वापर करणं, योग्य वेळेला मी सत्याग्रह करणं आणि 'माणूस' कारांनी सेन्सॉरशिपची पत्रास न ठेवणं ही रणनीती काही दिवसांतच ठरून जाणार होती. आपण एकमेकांशी बोलायच्या आधीच दोघांचीही मनं तापलेली होतीच. ती एकत्र आली 'माणूस'मध्ये 'थँक्यू मिस्टर ग्लाड' आल्यानंतर, त्या पत्राचा शेवट मी 'थँक्यू मिस्टर ग्लाड', 'थँक्यू मिस्टर अनिल बर्वे असा केला होता. खरं म्हणजे त्यात 'थँक्यू मिसेस इंदिरा गांधी', आणि 'थँक्यू मिस्टर माजगावकर' ही वाक्येदेखील यकायला हवी होती ! ३ इथून पुढे 'माणूस' पूर्णपणे बंद होईपर्यंत १२ वर्षांहून अधिक काळ मी कमीअधिक सातत्याने तुमच्याबरोबर होतोच.