पान:निवडक अंतर्नाद.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८५-८६ मध्ये मी शेतकरी संघटनेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झाल्यानंतर पुण्यातच फार थोडा वेळ मिळत असे तरी काही महत्त्वाच्या घडामोडींनंतर आपली भेट होतच असे. खरं म्हणजे ७४पासून तुमच्यासमोरच्या अडचणी/कटकटी वाढायला सुरुवात झाली होती. दर्डाप्रकरण ही या कसोटीच्या १२/१३ वर्षांची सुरुवात होती. 'माणूस ची पहिली १५ वर्षदेखील भरपूर धावपळ करावी लागली होती, कष्ट उपसावे लागले होते, आर्थिक गणित जुळवताना नाकी नऊ येतच होते; पण त्या वर्षातलं कोणतंही धाडस / साहस उलटून अंगावर आलं नव्हतं, यशस्वीच ठरलं होतं. आपण एक नवी ओळख, नवा अवकाश मराठी माणसांच्या वैचारिक जगात निर्माण करतो आहोत ही खात्री म्हणजे टॉनिकच होतं. तुम्ही आणि तुमची छोटीशी टीम ( family get-together ?) त्या टॉनिकवरच आनंदात नवनवीन विशेषांक काढत होता ! आता परिस्थिती बदलली द यांच्या (कथित) बदनामी प्रकरणात कोर्टातले हेलपाटे दमवायला लागले; आणीबाणी जाहीर झाली आणि सेन्सॉरशिपचं लचांड मागे लागलं. 'पॅपिलॉन' हे खरं तर भाषांतरित पुस्तक, पण नाव विचित्र वाटल्यामुळे सेन्सॉरने तो मजकूर अडवून ठेवला होता! याच दिवसात श्री. बाबासाहेब पुरंदरे राजहंस प्रकाशनमधून निवृत्त झाले. ('जनांचा प्रवाहो'च्या पहिल्या आवृत्तीवर प्रकाशक म्हणून त्यांचं नाव छापलं होतं - मी धन्य झालो होतो! ) आणि त्यांची हमखास खपाची पुस्तकं गेल्यामुळे तिथलं गणितही अवघड होऊन बसलं, मळेकर वाड्याच्याही कोर्टकचेऱ्या होत्याच, कागद- शाई - छपाई या सगळ्याच वस्तूंच्या किमती सतत वाढत होत्या. मुळातच प्रेस काढताना तुम्ही साशंक होता, ती शंका खरी ठरायला सुरुवात झाली होती. 'दिनांक' हे नवीन साप्ताहिक सुरू झाल्यामुळे समाजवादी वाचकांचा प्रतिसाद कमी व्हायला लागला होता. तुमच्यावरच्या घरच्या जबाबदा-याही वाढत होत्या. पन्नाशी जवळ आल्यामुळे पूर्वीसारखी भटकंती करणं अवघड झालं होतं. त्यामुळे नवे ताजे अनुभव, इनपुट्स तुम्हांला सेकंडहँडच घ्यावे लागत होते. वैभवाच्या दिवसांच्या आठवणी शिल्लक होत्याच. 'आमची गंधर्व नाटक कंपनी आहे; मखमली पडदा, पैठण्या, खरे सोन्याचे दागिने अशी मिजास करणारी, रोज पंचपक्वान्नं करून जेवणारी, प्रेक्षकांना अत्तर लावणारी! मात्र गड्यांनो, तो काळ संपला आणि कठीण काळ आल्यावर, कर्ज डोक्यावर बसल्यावर तुम्ही आमच्याकडे आलात!' हे आम्ही सतीश कामत, शिरीष सहस्रबुद्धे, शेखर पुरंदरे अनेकदा ऐकत होतो. मी, कितीही संकटं आली तरी प्रारब्धम् उत्तम जनाः न परित्यजन्ति!' नवीन लेखक आणि नवीन विषय यांचा शोध नव्हे, नुसती चाहूल लागली की तुमचे डोळे चमकायला लागायचे आणि चेहऱ्यावरती गोड, निर्मितिपूर्व अस्वस्थता दिसायला लागायची. माझ्यापासून अविनाश धर्माधिकारीपर्यंत पुन्हा एक नवीन पिढी 'माणूस'मध्ये आणीबाणीपासून लिहिती झाली आणि तुमचे (आणि आमचेही) आनंदाचे दिवस परत आले केवळ नव्या कल्पना, नवे निष्कर्ष, बेधडक मतप्रदर्शन करण्याची हिंमत यांचं कौतुक, चांगल्या मार्मिक निरीक्षणाला मोठ्याने हसून हातावर यळी देऊन दिलेली दाद, फिरायला गेल्यावर मध्येच 'गड्या' म्हणून अलगद खांद्यावर ठेवलेला हात हा खुराक आम्हांलातरी दुसऱ्या कोणाकडून मिळणार होता ? तुम्ही माझ्यापेक्षा दीड पिढीने वडील आणि इतरांपेक्षा दोन अडीच पिढ्यांनी! तुमचे समवयस्कही ये एकदा गप्पा (!) मारायला मार्गदर्शनाच्या नावाखाली हे आपल्याला जाम घुमवणार आणि एक म्हणत असत, पण कप चहाच्या बदल्यात स्वतःच्या डोक्यातलं सगळं भंगार आपल्या डोक्यात घुसवून, आपल्याला गोंधळात पाडून, आपण पुन्हा यांच्याच दवाखान्याचे लाइफ मेंबर होणार हे न कळण्याइतके आम्ही बावळट नव्हतो; कदाचित म्हणूनच तुमचे लाडकेही होतो ? तुम्ही माझ्यापेक्षा दीड पिढीने वडील आणि इतरांपेक्षा दोन अडीच पिढ्यांनी! तुमचे समवयस्कही 'ये एकदा गप्पा (!) मारायला' म्हणत असत, पण मार्गदर्शनाच्या नावाखाली हे आपल्याला जाम घुमवणार आणि एक कप चहाच्या बदल्यात स्वतः च्या डोक्यातलं सगळं भंगार आपल्या डोक्यात घुसवून, आपल्याला गोंधळात पाडून, आपण पुन्हा यांच्याच दवाखान्याचे लाइफ मेंबर होणार हे न कळण्याइतके आम्ही बावळट नव्हतो; कदाचित म्हणूनच तुमचे लाडकेही होतो? पु. ल. देशपांडे हे केवढं मोठं नाव ! मल्लिाकार्जुन मन्सूर यांच्या पुण्यात तीन सलग मैफली झाल्या. (१९७६ ऑक्टोबर - आणीबाणी असूनही तीन सोन्याचे दिवस!) त्यांचं रसग्रहण करणारा मोठा लेख मी 'माणूस' मध्ये लिहिला. 'मल्लिकार्जुन मन्सूर यांचे चिरयौवन!' तो पुलंना आवडला. त्यांनी तुम्हांला फोन केला आणि 'ह्य कोण नवा मुलगा आहे; माझ्याकडे घेऊन ये म्हणाले, तुम्ही मला म्हणालात, 'पुलचा फोन आला होता. (विनोबांप्रमाणेच तुम्हीही बहुतेक सगळ्यांचे उल्लेख एकेरी करू लागला होता); त्याला तुझा लेख आवडला. आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे.' मी म्हणालो होतो, 'मग त्यांनी मला भेटायला यायचं की मीच त्यांच्याकडे जायचं!' तुम्ही अक्षरश: गडबडून गेलात, नजरेमध्ये आश्चर्य कौतुक आनंद होताच. अक्षरशः रदबदली केल्यासारखं म्हणालात, 'बाबारे, तुझं खरंच आहे; पण माझा आता शब्द गेला आहे, चल माझ्याबरोबर!' आपण जाऊन आलो. पुलंनी मला पेट्रनाइज करण्याची धडपड केली; ती मला आवडली नाही हे तुम्ही ओळखलं होतं; पुन्हा कुणाला तसा शब्द तुम्ही दिला निवडक अंतर्नाद २१३