पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बबन्याच्या निरोपावर पोरी फिदफिदल्या. शेवंताला कोपरखळ्या हाणू लागल्या. तशी थिरकत पावलांनी शेवंता घराकडं पळत सुटली. "दाजी, त्यास्नी देण्या-घेण्याचं काय न्हाई. बिन आई बाचं पोरगं, त्येला बी त्याच्या मामानं वाडिवलय हां, जरा वाढलंय लाडात खरं. मुंबईला मिलमदी नोकरी. लालबागला बारकीशी खोली, हिकडं जराशी वावरं हाईत ती हाईतच खरं मागणं एकच त्येचं लगीन लागल्यावर पोरीला लगेच आठ दिवसाच्या आत सलामवाडी - मुंबई गाडीत बसवायची. त्येला रजा न्हाई मिळत. खाण्यापिण्याचं त्येचं हाल नकोत म्हणून लगेच राजा-राणीच्या संसाराला पाठवायची. " जानूतात्या हरखला, लांब राहील पोरगी, खरं सुखात राहील. कायमची नोकरी, त्यात मालकीची खोली. गुणाची माझी लेक ती. नेटानं संसार करील. ज्याच्या घरी जाईल तिथं लक्ष्मी पाणी भरील. दृष्ट लागावी अशी दिसती. रुक्मिणीवरच गेलीया एवढी कष्टात वाडीवली. आईवेगळी लेक, लांब हायली तरी चालंल काळजावर दगड ठेवीन, उजवायचीच पोरीला. गहिवरलेला जानूतात्या, मोहोरलेली शेवंता, मामा रात्रीचं जेवून सरवड्याला परत गेला. फौजेत लढताना गोळी लागून मातीत मिसळलेला मोठा पोरगा यशवंत आणि मुलाच्या हबक्यानं अकाली गेलेली रुक्मिणी दोघांचे फोटो छातीशी धरून जानूतात्या रात्रभर हंबरत राहिला. बापाचा जगावेगळा आनंद निरखीत शेवंता रात्रभर खुळ्यासारखी बसून राहिली. पहिली दोन चार वर्ष शेवंताचा नवरा धनाजी वेळेवर घरी यायचा, हळूहळू मिल सुटली तरी त्याचा येण्याचा वेळ वाढू लागला. घरात अंगावर पिणारं लहान पोरगं आणि रात्री उशिरा लटपटत्या पायांनी दारात येऊन उभा राहणारा नवरा, शेवंता सटपटली. पोराच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावली. हातापाया पडली. जोतिबाला, अंबाबाईला नवस बोलून झाला. धनाजीच्या तोंडाचा वास काही कमी व्हायला तयार नाही. एका गणपतीत शेजारची जाधवीण शेवंताच्या कानाला लागली! "हिथ मंडपाच्या मागे कशी जुगार खेळत्यात? तशी तिकडं परळलाबी एक स्वतंत्र खोली हाय म्हणं कुणाचीतरी." "कसली?" "जुगार खेळायची. " "मग?" "धनाजीभाऊ डबल पाळीला थांबतो म्हंत्यात तवा ते मिलमंदी कधी असत्यात?" १२६ • निवडक अंतर्नाद "तर गं बाई?" “आगं शेवंता, तिकडे जुगार खेळत बसत्यात. परळच्या दोस्ताच्या खोलीवर, " शेवंता हबकली. मामा मामींनी लाडात वाढवलेलं पोरगं, कुणाचा एक शब्द ऐकून घ्यायचा नाही. माझंच खरं शेवंतानं बसकण मारली. तिला उठता येईना. हळूहळू शेवंताच्या संसाराचं कंबरडं मोडत गेलं. "शेवे, वो लिज्जत पापड के हाफिस में चल जायेंगे." "कशाला ग भाभी?" "अग चल तो वो सब बाईलोगोंका काम है जाके उनको बतानीका, हमकोबी काम करने का करके." "कशाचं काम भाभी? काय गमंना मला. " १५ है "तू बैठके खाएगी? क्या महाराणी "कोन बसून खातंय हिथं भाभी? माझं जनावरासारखं राबनं बघतीस न्हवं? मला कामाची लाज न्हाई. धुणीभांडीच काय, घाणबी साफ करीन मी. त्येच करत आलीय, धनी गेल्यापास्नं, खरं धुणी-भांडी करणारी बाई, गोवंडीच्या झोपडपट्टीत हाणारी बाई म्हटल्यावर येणारी जाणारी सगळीच कशी बघत्यात काय सांगू तुला? ह्या पुरुषमंडळीच्या डोळ्यातली घाण कशी साफ करायची सांग मला ?” "अगे घाबरती काय? हणम्याबी आता जवान झालाय, इत्ना बडा लडका है तेरा, डरनेका नहीं, वो भी बेचताय ना लोकलमें कुछ ना कुछ ? तेरा कमाई, उसका कमाई - सब अच्छा हो जायेगा चल उधर, " लिज्जत पापडच्या ऑफिसमध्ये कसल्यातरी कागदांवर शेवंताक्कानं अंगठे उठवले. पीठ झोपडीत आणून देतील. आपण कणीक मळून लाटायची. रेल्वे रुळाच्या पलीकडे वाळवायचे. वाळलेले पापड अलगद भरून पाठवायचे. दिवसाला वीस-तीस रुपये सुटायचे. शेवंताक्का हातांना रग येईपर्यंत पापड लाटू लागली. बघावं तेव्हा तिचं पोळपाट- लाटणं बेसुमार लटलटू लागलं. दिवसाला पन्नास-साठ रुपये मिळू लागले. अतिश्रमानं शेवंताक्का सुखाने झोपू लागली. एक दिवस सुकलेले पापड वाऱ्यानं उडतील म्हणून शेवंताक्का गोळा करायला गेली. एवढ्यात आयेशाबी धावत आली. शेवंताक्कांचा हात धरला आणि पिसाटल्यासारखी धावू लागली.