पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पंचीम संजय कृष्णाजी पाटील “चिमणी विझलेली. छप्पर डुगडुगू लागलेलं. अंधाराचा जबडा वासत चाललेला. शेवंताक्काचा आवाज भिजत-भिजत चाललेला. बुलडोझरचं चाक पुढे पुढे सरकलेलं. बुलडोझरचं पातं आणि शेवंताक्काचं जातं - दोन्हींची घरघर चालूच.” एका स्त्रीच्या दुर्दैवाची अंतःकरण हेलावणारी कर्मकहाणी. "नाग को दूध दे दो बाबा, नाग को दूध दे दो” शेवंताक्का फाटक्या आवाजात ओरडत होती. बांद्रा स्टेशनच्या फ्लायओव्हरच्या छाताडावरनं मुंगीच्या गतीनं हलणाऱ्या गर्दीला तिच्या फाटक्या आवाजाचं कौतुक नव्हतं. शेवंताक्काच्या अगदी समोरून अडखळून पडून जाणाऱ्यांनाच तिचा आवाज कसाबसा ऐकायला येत होता. त्यामधले निम्मे तरी, "ना जाने कहांसे आते है भीकमंगे लोग" म्हणत खुनशी नजरेनं बघत जात. थोडेसेच कोणी श्रद्धाळू तिच्या हातातल्या नागाकडे बघत, भक्तिभावानं नमस्कार करत. कोणीतरी एखादं नाणं टाके. नाग हातात धरून-धरून शेवंताक्काच्या दहा बोटांपासून ते दोन्ही खांद्यांपर्यंत रग लागली होती. मध्येच तिनं नागोबाचं तोंड खाली झुकवलं, दुधाच्या वाटीत कोंबलं. निघण्यापूर्वीच इसाकशेठनं तिला नागोबाचं शिवलेलं तोंड दाखवलं होतं. मुळात नागोबा दूध पीत नाही. त्यात तो तोंड शिवलेला. पण प्रश्न धार्मिकतेचा होता, इसाकशेठनं बजावून सांगितलं होतं, "देख आक्का, वो दूध पिये ना पिये, उसका निजी मामला है, लेकिन लोगोंको कुछ दिखाए बिना उनका हात खिसेतक जाता नहीं!” ...खरंच की इसाकशेठचं, नागोबा दूध पिऊ दे नाहीतर नाही, लोकांच्या धार्मिक भावनेला हात घातलाच पाहिजे. तरच हात खिशात जाईल. बरेच हात खिशांत गेले तरच तिसरी मोकळी टोपली पैशांनी भरणार, दोन नागांचं भाडं शंभर रुपये, इसाकशेठचे शंभर एकुणात तीनशे जमले तरी बास, शंभर हातील हाताशी. तेवढ्यात आठवडा जाईल. तंवर झोपडीचा व्यवहार होईल. जातं- जुनेरं, ट्रंक आणि टमरेल घेऊन गाव गाठू. पंचीम गेली तर गेली. गौरी गणपतीला तरी गावपांढरीत घुसता येईल. आला तर आला दिवस, गेला तर गेला दिवस मरगूआईच्या पायरीवर डोस्कं ठेवून देऊ. ऊन चरचरायला लागलं. फाटक्या पदरामधनं, बिनतेलाच्या केसांमधनं मेंदूपर्यंत झिरपायला लागलं, घसा सुकून सुकून रखरखीत वाळवंटासारखा झालेला. सकाळी प्यालेल्या कोया चहाचा मागमूसही नाही. शेवंताक्कानं बाजूच्या तांब्यामधलं मचूळ पाणी घोट घोट खाली ढकललं. रिकामी आतडी भरून पावली. १२४ निवडक अंतर्नाद "कसला ग बाई ह्यो श्रावण म्हणायचा? गावाकडचा वैशाख परवडला –" तिला स्वतःचंच नेहमीचं वाक्य आठवलं. अर्धा दिवस उलटायला आला. जेमतेम सत्तर-ऐंशी रुपये जमले असतील. कसं व्हायचं? शेवंताक्कानं निरोशनं दोन्ही नाग दोन्ही टोपलीत वेटोळे घालून बंद केले. पुलाच्या काठाच्या ओबडधोबड आधाराला डोकं टेकवलं. तसा आठवणींचा टोपलीमधला तोंड न शिवलेला नाग अवचितपणे शेवंताक्काच्या समोर सरसरून उभा राहिला. कालीकुट्ट, मचमचती, लवलवती जीभ नाचवत तिची नजर भेदू लागला. “दो रुपय का तेरा सुई, तेरा सुई का दो रुपय" हणम्यानं सेकंड क्लासच्या डब्यात कचकचून आवाज दिला. निबर गर्दी जराशी थरथरली. परत एकमेकाला गळामिठी घालून स्तब्ध, हार्बर रेल्वेची "धडाक धुम, धडाक धुम" कलकल चालूच, "शर्ट सिलाव, पॅन्ट सिलाव, ब्लँकेट सिलाव, चद्दर सिलाव, चड्डी सिलाव, । सिलाव, कुछ भी सिलाव, दो रूपय का तेरा सुई, तेरा सुई का दो रुपय –" हणम्यानं परत जोर धरला. हे तसे गर्दीमधून पाच-दहा हात पुढे आले. कुठला हात कोणाचा ब्रह्मदेवाला माहीत. वडाच्या पारंब्यांसारखे अधांतरी लोंबकळणारे ह्यत प्रत्येक हातामधलं दोनचं नाणं, नोटा खेचत तिथं हणम्यानं सुईच्या पाकिटाची तजवीज केली. आणि घसा फाडत तो पुढे सरकला, "दस रूपय का छे" असं म्हणत हणम्यानं संत्री विकण्यापासून सुरुवात केली होती. अगदी अगदी नाईलाज झाला की दस रुपयाला दह्य संत्री द्यायची. एखादा दिवस भाकड पण माल परत आणायचा नाही. संत्री, चिक्कू, पाकिटं, पेनं असू देत नाहीतर डायऱ्या चेंबूरच्या सिंधीची ताकीदच होती तशी. इमानदारीसे बेचो, कमाओ. छोट्या सिंधीकडे हणम्यासारखी अशी गोवंडीच्या झोपडपट्टीमधली पन्नासेक पोरं कामाला होती. रेल्वेवाले, पोलीस, टिपनाट भाई लोक ह्या सगळ्यांच्या हप्त्यांचं