पान:निवडक अंतर्नाद.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माणूस आहोत असं वाटू लागलं होतं. या वयात इतर मित्र नोकरीत सेटल झालेले, लग्नाच्या तयारीला लागलेले बघत होतो. इथे माझ्याकडे सगळाच आनंद होता, जीवनात कधी नव्हे एवा मी अपसेट झालो होतो. राहुलला माझी अवस्था कळत होती. तो सतत माझ्याबरोबर असायचा. सर्व्हिस ट्रॅक संपून मेन ट्रॅक आला. रात्रीची वेळ. आजूबाजूला शांतता. समोरून लोकल निघालेली दिसत होती. आता पुढच्या लोकलसाठी थांबावं लागणार, त्याला बराच वेळ असणार, पण पर्याय नव्हता, पळत जाऊन लोकल पकडणं शक्य नव्हतं, कारण लोकल माझ्या दिशेनं येत होती. आता मिनिटभरात ती आपल्याजवळ येईल, बाजूला व्हायला हवं... मी क्षणभर ट्रॅकवर थांबलो. हाच तो क्षण. लोकल समोरून येत होती व मी नि:स्तब्धपणे ट्रॅकवर उभा होतो. लोकलखाली मरून जावंसं वाटत होतं. कशी कोणास ठाऊक, बाजूला चालणाऱ्या राहुलने माझी ती अवस्था ओळखली होती. त्याने मला धावत जवळ येऊन बाजूला खेचलं व क्षणार्धात लोकल वेगानं निघून गेली होती. "जिदंगी मरने के लिए नही होती, जीने के लिए होती है तुम जिओ. हम सब के लिए, मेरे लिए, तुम्हारे माँके लिए, तुम्हे जीना पडेगा, तुम मुझसे वादा करो!” कधी नव्हे तो मला ओरडून बोलला होता. मी त्याला शरणागत होतो. त्याने माझी जिंदगी वाचवली होती ह्याची कुठेही वाच्यता केली नाही. परत त्याबद्दल कधीही बोलला नाही. मी मात्र सावरलो. ११६ निवडक अंतर्नाद ठरवलं की हा कोर्स सोडून द्यायचा. एवढी वर्षं घातली. आता बस झालं. कॉम्प्युटर कोर्स जॉईन केला. राहुलला ते तितकंसं आवडलं नाही. कोर्स पूर्ण झाल्यावर मला नोकरीही लागली. विरारहून रोज जाणंयेणं करणं शक्य नव्हतं म्हणून दादरला जागा बघायचं ठरवलं. राहुलपासून दूर व्हायची वेळ आली होती. मलाही वाईट वाटत होतं पण पर्याय नव्हता. राहुलला शेवटचं कडकडून भेटलो. जणू नवरा बायकोपासून दूर चाललाय, कुठेतरी युद्धावर "राघव, अब हमारे रास्ते अलग हो गये है. तोभी हम मिलते रहेंगे. तू मुझे हमेशा याद आता रहेगा.” मी त्याच्यापासून वेगळा झालो. माझी जिंदगी बनली, एक दिशा मिळाली. राहुलला अजून दिशा मिळत नव्हती. त्याने मला बोलावलं होतं. मी त्याला येतोही म्हणालो होतो. विचारांच्या तंद्रीतून मी भानावर आलो. वर्तमानात येत मी ट्रॅकवरून बाजूला झालो. ट्रेन धडधडत निघून गेली. हाच तो क्षण! राहुलने मला अशाच क्षणी वाचवलं होतं आणि • राहुलला वाचवायला कोणीही नव्हतं. त्याने माझ्याच पद्धतीनं आत्महत्या केली होती. मला वाचवून मला वाचवून तो मेला. मी त्याच्यासाठी काही करू शकलो नाही. आता हे शल्य आयुष्यभरासाठी आहे. राहुलने आत्महत्या का केली? नक्की माहिती नाही. सत्य कधी समजत नाही. आयुष्याचं काही खरं नसतं हेच खरं. SAN Shaila (जून १९९८) रेखाटन शैला सायनेकर