पान:निवडक अंतर्नाद.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुजरातीमधून 'राहुलची बॉडी आली वाटतं' असं म्हणालं, त्यामुळे हेच राहुलचं घर हे न सांगता कन्फर्म झालं. त्याच्या वडलांनी मोठ्या भावानं आम्हाला जवळपास पकडलंच. राहुलही त्यांच्याजवळ माझ्याबद्दल बरंच काही सांगत असावा. कारण घरात सर्वांना माझं नाव चांगलं परिचयाचं होतं. हे सगळं कसं घडलं हे सांगणं आमची जबाबदारी होती. जणू घडलं त्या घटनेलाही आम्ही जबाबदार होतो. कदाचित आम्ही ते होणं यळू शकलो असतो असं त्यांना वाटत होतं, त्यांचा मुलगा आमच्याबरोबर राहिल्यामुळंच गेला होता असा सूर उमटत होता व त्यावेळी त्याचा प्रतिवाद करणं बरोबर नव्हतं, आम्ही सर्वांनीच वाद यळला. राहुलची डेडबॉडी त्यांच्या ताब्यात दिल्यावर खरं तर आमची जबाबदारी संपली होती. पण राहुलच्या मृतदेहाला अग्नी दिल्याशिवाय आमची सुटका नाही हे लक्षात आलं. आम्ही अॅम्ब्युलन्सही थांबवली होती. कारण जाताना परत अॅम्ब्युलन्सने जायचं ठरवलं होतं. निघताना मात्र राहुलचे वडील माझ्या गळ्यात पडले व रडू लागले. "तुम्ही राहुलसाठी खूप केलंत. जे झालं ते झालं. तुमचे आभार कसे मानू? आमच्या मते राहुलने विशिष्ट तऱ्हेने घडायला हवं होतं. राहुल तसा घडला नाही. त्यात कोणाचीच चूक नाही. राहुलचं नशीब!” मला त्यांना काय उत्तर द्यावं हे समजेना. राहुल गेल्याचं दुःख त्यांच्याएवढंच आम्हालाही होते, त्यांना ते सर्व सांगण्यात अर्थ नव्हता. मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्यांना बरं वाटलं असावं. त्यांचा निरोप घेऊन निघालो तेव्हा दुपारचं ऊन डोक्यावर आलं होतं. आम्ही सर्वच झाल्या प्रकाराने अस्वस्थ होतो. येताना आम्ही सर्वच मागे बसलो. एकमेकांशी फारसं बोलतही नव्हतो. कोणी झोप काढत होतं. कोणी शांतपणे खिडकीबाहेर बघत होतं. मी राहुलचा विचार करीत होतो. त्याने आत्महत्या का केली असावी? मी त्याच्यापासून दूर गेल्यामुळे? मी त्याला न मिळाल्यामुळे ? आमच्या दोघांत दुरावा निर्माण झाला आहे असं त्याला वाटल्यामुळे? त्याने मला बोलावूनही मी त्याला काहीसं उशिरा भेटण्याचं ठरवलं म्हणून? ह्या सगळ्याची सुरुवात कशी कशी झाली? सांगणं अवघड आहे. पण हैद्राबादला कुठेतरी झाली. राहुल बघताबघता माझ्याजवळ आला. अगदी जवळ आला. जणू आम्ही नवराबायको होतो. इतरांना ह्याबद्दल कल्पनाही नव्हती. आयुष्याच्या बेसावध क्षणी सुरू झालेल्या हकीकतीची एवढी मोठी किंमत द्यावी लागली होती काय? मी त्याच्यापासून दूर झाल्यामुळे अस्वस्थ नव्हतो, मला मुलींबद्दल आकर्षण तेव्हाही वाटायचं, आताही वाटतं, राहुल मला आवडायचा हे खरं, पण त्याच्याकडे मी माझी बायको, माझ्या आयुष्याचा जोडीदार वगैरे दृष्टीतून कधी बघितलं नाही. आम्ही दोघं जवळ होतो तेव्हा मला त्याची ओढ वाटायची हेच खरं, इतर रूम पार्टनरना चुकवून आम्ही दोघं एकमेकांच्या जास्तीतजास्त सहवासात राहायचा प्रयत्न करायचो हेही खरं आहे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गोष्ट करायची. त्यात तो माझी बायको किंवा मैत्रीण, प्रेयसी आणि मी त्याचा नवरा किंवा मित्र, प्रियकर असायचो. तेवढ्या वेळेपुरती ती गुंतवणूक माझ्यापुरतीही खरी असायची. पण त्यानंतर मी केवळ राहुलचा विचार करायचो नाही. हैद्राबादहून आम्ही मुंबईला आलो तरी आमचं प्रकरण चालूच राहिलं. त्याचा शेवट काय होणार, कुठे होणार ह्याची दोघांनाही कल्पना नव्हती. त्याचा विचार करण्याची आमच्या दृष्टीने लगेच जरूरीही नव्हती. आमचा कोर्स पूर्ण होणं हे आमच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचं होतं व तोच पूर्ण होत नव्हता. त्यामुळे टेन्शन वाढत होतं, अस्वस्थता वाढत होती. मी बाहेर बघितलं. आम्ही विरारमध्ये आलो होतो. अॅम्ब्युलन्स थांबली रात्र झाली होतीच. घरी परत स्वयंपाक करायचा सगळ्यांनाचा कंयळा आला होता. त्यापेक्षा बाहेरच जेवायचं ठरवलं. आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंटमधे जेवलो. मित्रांबरोबर गप्पा मारल्या. चांगलं हादडलं. मस्ती केली. जणू काल काही घडलंच नव्हतं. जीवनाचा नवीन अध्याय परत सुरू झाला होता. कोणीही मुद्दाम अशी राहुलची आठवण काढली नाही. माझ्या मनात त्याचा विचार येत होता तरी बोललो नाही. कदाचित इतरांचंही तसंच असावं. राहुलचे काही पैसे उरले होते. रेस्टॉरंटचं बिल म्हणून मी तेच पैसे दिले. जेवून उठताना सगळे म्हणाले, 'राहुल के नाम आखरी खाना' आणि मग सगळे भसकन हसले. मित्र मला नेहमीच्या ठिकाणी सोडायला आले. तेथे सर्वांनी लघवी केली. एकेकाने माझ्या हातात हात मिळवला, "आम्ही तुला त्रास दिला. पण तुझी आम्हाला मदत झाली. खूप बरं वाटलं. " गोसावी अगदी मनापासून बोलतो आहे हे कळत होतं. दोन दिवसात बरंच काही घडून गेलं होतं. कायमचं लक्षात राहील असं घडून गेलं होतं. "काही वाटलं तर बोलवा, मी तुमच्यासाठी हजर आहेच, " • निघताना मी मित्रांना म्हटलं. ते निघाले. त्यांची आणि माझी दिशा वेगळी झाली होती. मी रेल्वेच्या सर्व्हिस ट्रॅकवरून चालायला लागलो, ही नेहमीची सवय होती. ह्य ट्रॅक ओलांडून मग मेन ट्रॅकला जायचं. दोन तीन मिनिटं त्या ट्रॅकवरून चालायचं की मग प्लॅटफॉर्म, लोकल ट्रेन घ्यायची आणि मग दादर, डोक्यात परत पूर्वीचे विचार सुरू झाले. कोर्स पूर्ण न झाल्यामुळे त्यावेळी फार डिस्टर्ब व्हायला झालं होतं. आईकडून पैसे मागणं लज्जास्पद वाटत होतं. आपण फालतू निवडक अंतर्नाद ११५