पान:निर्माणपर्व.pdf/209

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यामुळे पिकांच्या तुडवातुडवीचा कार्यक्रम दिवसभर व्यवस्थित पार पडू शकला होता.

 पोलीस गावात असल्याने दुसऱ्या दिवशी दलितमंडळी विसंबून होती. तुडवातुडवी होणार नाही अशी त्यांची समजूत; पण ती पूर्ण चूक ठरली. पोलिसांच्या डोळ्यांदेखत दुसऱ्या दिवशीही सूर्योदयानंतर २००-३०० गुरे आदल्या दिवशीप्रमाणेच दलितांच्या जमिनीत पिकांची नासधूस करण्यासाठी व्यवस्थित घुसवली गेली. दलितांनी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. पोलिसांनी सांगितले की, त्यांना तसा हकुम नाही. ते माणसांच्या बंदोबस्तासाठी आलेले होते. गुरे, पिके यांच्याशी त्यांना कर्तव्य नव्हते.

 दलितांनी पुन्हा धावाधाव केली.
 दुपारपर्यंत तहसीलदार-फौजदार वगैरे वरचे अधिकारी गावात पोचले.
 नासधूस प्रथम थांबवण्यात आली.
 दोन्ही गटांना अधिकाऱ्यांनी एकत्र आणून एक तात्पुरती तडजोड घडवली.
 दलितांच्या जमिनीवरचे सगळे उभे पीक सरकारने ताब्यात घेतले.
 कुणी कायदा हाती घ्यायचा नाही अशी समज देण्यात आली.
 तशी दवंडीही गावभर फिरवण्यात आली.


 दि. २८ डिसेंबर, तिसरा दिवस : जयसिंगराव पाटलांचे गावात आगमन. बैठक भरते. ज्वारी हातात घेऊन शपथा दिल्या घेतल्या जातात. पीक सरकारजमा असले तरी पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे गुरे घालून ते समूळ व पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्णय घेतला जातो.
 दि. २९ डिसेंबर, चवथा दिवस : पुन्हा २००।३०० गुरे दलितांच्या शेतात घुसली. गावात बंदोबस्तासाठी पोलीस होते. पीक सरकारने जप्त केलेले हात सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तडजोड ठरलेली होती; तरीही हे घडले.
 दि. ३० डिसेंबर ... वरील कार्यक्रम पुढे चालू.
 दि. ३१ डिसेंबर ... वरील कार्यक्रम पुढे चालू.

 नंतर नंतर गडीमाणसेही कापणीच्या कामाला लावण्यात आली. गाड्यातून पीक-कडबा वगैरे गावात वाहूनही आणला गेला. प्रथम फक्त नासधूस होती, नंतर चक्क चोरी-लुटालूट.

 एकण नष्ट झालेल्या पिकाचे क्षेत्र अंदाजे १७ हेक्टर. बाजारभावाने होणारी या पिकाची किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये. शिवाय कडबा सुमारे आठ हजार रुपये किंमतीचा.

निर्माणपर्व । २०८