पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्व करतात. कोटींची उड्डाणं पार केलेल्या हेल्पर्सनी आता आपल्याला लागणाच्या गरजेच्या २५ टक्के उत्पन्न स्वकष्टातून मिळवण्याचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. अंतिम लक्ष्य आहे १०० टक्के स्वावलंबन, 'हात ना पसरू कधी', असा सुप्त संकल्प घेऊन नसीमा हरजूक यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी संस्था, तिचे विश्वस्त, लाभार्थी, कर्मचारी, देणगीदार या साऱ्याचं एक स्वप्न आहे. अपंगत्वाचं समूळ उच्चाटन, निर्मूलन! त्यासाठी जे लागेल ते करायची त्यांची तयारी आहे, यातच सारं आलं!
 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड' ही संस्था, नसीमा हुरजूक व त्यांचे सर्व समविचारी सहकारी यांनी सरकार व समाजापुढे स्वत:च्या धडपडीतून एक अपंग पुनर्वसनाचा कृतिशील (खरं तर अनुकरणीय) प्रकल्प समोर ठेवला आहे. तो आदर्श मानून प्रत्येक जिल्ह्यात असे प्रकल्प उभारले जातील, तर अपंगांचं पूर्ण पुनर्वसन शक्य आहे. गरज आहे सरकारच्या आणि समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची. 'हेल्पर्स' च्या आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यालयाला अद्याप मान्यता व अनुदान नसणं, 'स्वप्ननगरी'तील अपंगांच्या काजू उत्पादनांवर ४ टक्के व्हॅट असणं, अपंगांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसणं, अपंगांच्या रोजच्या जगण्यात त्यांच्या दृष्टीनं समाजानं उभारलेले अनेकविध अडथळे दूर करणं (रँप्स, ग्रिप्स, रेलिंग, प्रसाधनं इ.) हे जोवर समाज व शासन कर्तव्यबुद्धीने व अपंगांच्या मानवाधिकारांच्या हक्कांचे पालन म्हणून करणार नाही. तोवर एकट्या नसीमदीदी, एकटी ‘हेल्पर्स’ संस्था कुणाला पुरणार? या अपंगांविषयीचा आपला संवेदनासूचकांक वाढवू; प्रत्येक अपंगाला स्वाधार, स्वावलंबी बनवू!

•••

निराळं जग निराळी माणसं/३६