पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुदानावर डोळा ठेवून स्वत:ची, कुटुंबीयांची उपजीविका बनविणाऱ्या संस्थांची महाराष्ट्रात कमतरता नाही. अशा पार्श्वभूमीवर 'चेतना'चे प्रेरणा कार्य प्रबोधन मला अधिक महत्त्वाचे वाटते.
 पालक म्हणून मी चेतनास जवळून अनुभवलं आहे. आमच्या बालकल्याण संकुलात पोलीस सोडलेली, टाकलेली, चुकलेली मुलं-मुली आणत. त्यात काही गतिमंद तर काही मतिमंद असत. त्यातली अनेक मुलं आई-वडिलांनी अज्ञानानी वेडी म्हणून टाकली, सोडलेली असायची. रवींद्र, कुमार, अजित, भारती, मंजुषा, मुन्नी अशी किती तरी मुलं-मुली संस्थेत पोलिसांनी वेडी म्हणून दाखल केली होती. त्यांना चेतनाचा स्पर्श झाला अन् ती माणूस झाली...माणसाळली. पैकी कुमार, रवींद्र भाऊ होते. खरे होते ते गतिमंद (स्लोलर्नर) पालक अडाणी. पोलिसांना चिरीमिरी देऊन त्यांना संस्थेत घातलं...१०-१२ वर्षांनी त्यांना सक्षम, स्वावलंबी, सज्ञान झालेलं पाहिलेल्या...पहिल्यांदा काखा वर करून संस्थेत घातलेल्या काका म्हणून नातं सांगणाऱ्या त्या गृहस्थांनी या मुलांचा ताबा मागितला...कायद्यानं देणं भाग होतं...दिलाही आम्ही. मी आजही तो दिवस विसरू शकत नाही जेव्हा मला कळालं की काकाला या मुलांच्या नावाची शेती हडपायची तर होतीच शिवाय त्यांना जन्मभर राबणारे दोन वेठबिगार हवे होते... मतिमंदांकडे समाज पहातो कसा याचा हा आरसा. पवन नि चेतना उपेक्षितांना असं माणूस बनवते त्यामुळे ते सलामास पात्र!
 पण अशा संस्थेकडे शासनानी किती कोडगेपणाने, कोरडेपणाने पहावं? त्याला काही सीमा...चेतना मतिमंद विद्यालय सन १९८८-८९ पासून कोल्हापूरच्या शेंडापार्क, या कुष्ठ पुनर्वसन व उपचार केंद्राच्या परिसरात कार्य करते. ही जागा भगवान सहाय नावाच्या एका संवेदनशील शासकीय अधिकाऱ्यानं शाळेस तात्पुरती दिली...तेव्हापासून ती जागा शासन चेतनास कायमची देतेच आहे. किती सरकारं आली...मंत्री गेले...'सरकारी काम सहा महिने थांब' म्हण खोटी ठरवणारी दिरंगाई ही संस्था झेलते आहे. 'प्रहार'चे प्रहारी नामदार नारायण राणे यांच्यामुळे शाळेस जागा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे...शासन हललंय, पण जागं नाही झालंय...नारायणरावांनी मनावर घेतलेल्या प्रश्नास अपयश नाही असा लोक इतिहास सांगतात...तो प्रवाद चेतना मतिमंद विद्यालय बाबतीत खरा ठरावा असं समाजास वाटतं.
 चेतना विद्यालयानं आपल्या चेलवी प्रकल्पासाठी म्हणून आरोग्य विभागाकडे पडून (अक्षरश:) असलेली चार हेक्टर जागा मागितली आहे. बाल मार्गदर्शन

निराळं जग निराळी माणसं/१०८