पान:नित्यनेमावली.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

W बुधवार युक्ति नाहीं बुद्धि नाहीं विद्या नाहीं विवंचितां । नेणता भक्त मी तुझा बुद्धि दे रघुनायका ।। १ ।। मन हें आवरेना कीं वासना वावरे सदा । कल्पना धांवते सैरा बुद्धि दे० || २ || अन्न नाहीं वस्र नाहीं सौख्य जनामध्ये आश्रयो पाहतां नाहीं नाहीं | बुद्धि दे० ||३|| ||३|| बोलतां चालतां येना कार्यभाग कळेचिना | बहुत पीडलों लोकीं बुद्धि दे० ||४|| तुझा मी टोणपा झालों कष्टलों बहुतांपरी । सौख्य तो पाहतां नाहीं बुद्धि दे० | ५ || नेटकें लिहितां येना वाचितां चुकतों सदा । अर्थ तो सांगतां येना बुद्धि दे० ॥६॥ प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घ सुचना | मैत्रिकी राखतां येना बुद्धि दे० ||७|| संसारी श्लाध्यता नाहीं सर्वही लोक हांसती । विसरू पडतो पोटीं बुद्धि दे० ॥८॥ चित्त दुश्चित होतें हैं ताळतंत्र कळेचिना | आळसू लागला पाठीं बुद्धि दे० ॥ ९ ॥ कळेना स्फुर्ति होईना आपदा लागली बहू । प्रत्यहीं पोट सोडीना •