पान:नित्यनेमावली.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ सदा नीर लोटे । उदा० ||३|| अवस्था मनी लागली काय सांगों । गुणीं गुंतला हेत कोणासि मागों । बहुसाल भेटावया प्राण फूटे | उदा० ॥४॥ कृपाळूपणें भेट रे रामराया | वियोगें तुझ्या सर्व व्याळकू काया । जनांमाजि लौकीक हाही न सूटे | उदा० ॥५॥ अहा रे विधी त्वां असे काय केलें । पराधीनता पाप माझ उदेलें । बहूतांमधें तूकतां तूक तूटे | उदा० ||६|| समर्था मनीं सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिता असावी । घडेना तुझा योग हा प्राप्त खोटें । उदा० ||७|| अखंडीत हे सांग सेवा घडावी । न होतां तुझीं भेटि काया पडावी | दिसंदीस आयुष्य हे व्यर्थ लोटे । उदा० ||८|| भजों काय सर्वापरी हीन देवा । करूं काय रे सवं माझाचि ठेवा । म्हणों काय मी कर्म रेखा न लोटे । उदा० ॥९॥ म्हणे दास मी वाट पाहे दयाळा | रघुनायका । रघुनायका भक्तपाळा भुपाळा | पहावें तुला हें जिर्वी आर्त मोठें । उदा० ॥१०॥