Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६१

 त्याला । विसरूं. ॥६॥ माझा अहंभाव असे शरीरीं ।
तथापि तो सद्गुरू अंगिकारी । नाही मनी अल्पविकार
झाला । विसरूं. ।। ७ ।। आता कसा हा उपकार फेडू ।
हा देह ओवाळुनिदूर सोडूं | म्या एकभावें प्रणीपात केला ।
विसरूं. ॥ ८ ॥ जया वानितां वानितां वेदवाणी । म्हणें नेंति
नेंति तिला जे दुरुनी । नव्हे अंत ना पार ज्याच्या
रुपाला । विसरूं. ॥ ९ ॥ जो साधुच्या अंकित जीव झाला ।
त्याचा असे भार निरंजनाला । नारायणाचा भ्रम दूर
केला | विसरूं. ।। १० ।।


मंगळवार


समाधान साधुजनांचेनि योगें ॥ परी मागुतें दुःख होते
वियोगें । घडीने घडी शीण अत्यंत वाटे । उदासीन हा
काळ कोठे न कंठे ॥ १ ॥ घरे सुंदरे सौख्य नानाप-
रींचे । परी कोण जाणेल तें अंतरीचे । मनी आठवितांचि
तो कंठ दाटे । उदासीन० ॥ २ ॥ बळें लाविता चित्त कोठें
जडेना | समाधान तें काहि केल्या घडेंना । नयें धीर डोळां