हे पान प्रमाणित केलेले आहे.
६०
बुडाला । अद्वैत बोधपद॥८॥
करुणाष्टके
सोमवार
ज्या संगतीनेंच विराग झाला । मनोदरींचा जडभास
गेला | साक्षात्परात्मा मज भेटवीला | विसरूं कसा
मी गुरुपादुकांला ॥ १ ॥ सद्योगपंथे धरि आणियेले |
अंगेंच माते पर-ब्रम्ह केले । प्रचंड तो बोधरवी उदेला ।
विसरूं. ॥ २ ॥ चराचरीं व्यापकता जयाची । अखंड
भेटी मजला तयाची । परंपदी संगम पूर्ण झाला ।
विसरूं. ॥ ३ ॥ जो सर्वदा गुप्त जनात वागें । प्रपन्न
भक्ता निजबोध सांगें । सद्भक्ति-भावांकरितां
भुकेला । विसरूं० ॥ ४ ॥ अनंत माझे अपराध कोटी ।
नाणी मनी घालुनि सर्व पोटीं । प्रबोधितां तो श्रम
फार झाला । विसरूं० ।। ५ ॥ काही मला सेवनही न
झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें । आतां तरी अर्पिन प्राण