हे पान प्रमाणित केलेले आहे.
५८
पांडव असता, वनवासी, कळले कौरवांसी, त्यांनीं
पाठविले, ते ऋषी, सत्व हरायासी || १ || रात्र झालीसे,
दोन प्रहर, आले ऋषीश्वर | भोजन मागती सत्वर,
करूं कैसा विचार ||२|| साठी सहस्त्र, खंडी अन्न, दुर्वास,
भोजन | सत्व जातील, घेऊन, अंतर पडता जाण ॥ ३ ॥
आजि निष्ठुर कां, झालासी, कोठें गुंतलासी | माझी होईल
बा, गत कैसी, अनाथ मी परदेशी ||४|| कंठ शोषला
अनंता, प्राण जाईल आता । पदर पसरीते, तुज आता,
पाव रुक्मिणी कांता ॥ ५ ॥ आता न लावी उशीर, धर्म
चिंतातूर | अनर्थ करील, तो फार, एवढा करी उप-
कार ||६|| ऐकुनि बहिणीची करुणा, आला यादवराणा |
दौपदी लोळतसे, हरिचरणा, उद्धवचिद्धन जाणा ॥
करुणाष्टक
( एकादशीस म्हणणेचे )
तत्व कळतां मग जाणीव-भाव नाहीं । स्वानंद तृप्ति