पान:नित्यनेमावली.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६७ शेजारती ( आतां स्वामी सुवें निद्रा करा अवधुता । तरसिंह- सरस्वति अवधुता । चिन्मयसुखधामी जाउनि पहुड़ा एकता ||६६०॥ वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडिला । तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ॥ १ ॥ पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती । ज्ञानाच्या समया उजळुनि लाविल्या ज्योती ॥२॥ भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला । मनाचीं सुमनें जोडुनि केलें शेजेला ||३|| द्वैताचें कपाट लावुनि एकत्र केलें । दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडिले || ४ || आशा- तृष्णा कल्पनांचा सांडुनि गलवला । क्षमा दया शांती दापी उभ्या सेवेला ॥५|| अलक्ष्य उन्मति घेउनि नाजुक दुशेला निरंजनीं सद्गुरु माझा निजीं निजेला ||६|| ( एकादशीश म्हणणेचा ) .. • कृष्णा घांव बा लवकरी, संकट पडले भारी, हरि तूं आमुचा कैवारी, आलें विघ्न निवारी ॥ रु०॥