हे पान प्रमाणित केलेले आहे.
४२
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ।
तुकाराम तुकाराम तुकाराम ! ! !
(२३)
अहो बोलिलें लेकरूं ।
वेडें वाकुडें उत्तरूं ॥ १ ॥
क्षमा करा अपराध |
महाराज तुम्ही सिद्ध ॥ धृ ॥
अहो नाहीं विचारिला ।
अधिकार म्या आपुला ॥ २ ॥
तुका म्हणे ज्ञानेश्वरा |
राखा पायापें किंकरा ॥ ३ ॥
( २४ )
पाहे प्रसादाची वाट ।
द्यावें धुवोनिया ताट ॥ १ ॥