या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
४१ विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई "विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ! ! ! ( २२ ) मी तंव अन्यायी अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी ॥ १ ॥ तुज म्यां आठविले नाहीं कधीं । वाचे कृपानिधि मायबापा ।। २ ।। नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित ॥ ३ ॥ 'नावडें पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा ॥ ४ ॥ केला नाहीं करविला नाहीं परोपकार | नाहीं दया आली पीडितां पर ॥ ५ ॥३ 'करूं नये तो केला व्यापार | उतरी पार तुका म्हणे ॥ ६ ॥