Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०

गुरुदेव रामभाऊ महाराज || ( २ वेळा )
गुरुदेव रामभाऊ महाराज || ( २ वेळा )
निंबाळवासी सद्गुरुराज |
गुरुदेव रामभाऊ महाराज || ( २ वेळा )

(२१)

आकल्प आयुष्य व्हावें तया कुळा |
माझिया सकळां हरिच्या दासां ॥ १ ॥
कल्पनेची बाधा न हो कोणेकाळीं ।
ही संतमंडळी सुखी असो ॥ २ ॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा ।।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी ॥ ३ ॥
शरीर प्राणांसी करीन कुरवंडीं ।
क्षण एक न सोडी संग त्याचा ॥ ४ ॥
नामा म्हणे तया असावें कल्याण |
ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥ ५ ॥