पान:नित्यनेमावली.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ तीस लक्ष केली देवासी करुणा । कर्मकांड जाणा एक लक्ष ॥ ६ ॥ द्वादशसहस्त्र स्वात्मानुभवीं एवं जाणा सर्व संख्या ऐशी ।। ७ ।। ऐसे हे अभंग झालेसे भूतळों । पांच अंतराळी पत्रिकेची ।। ८ ।। चौतीस सहस्त्र लक्ष एक कोटि पाच सांमोनिया साच गेला तुका ।।९।। ( १६ ) सगुण हें ब्रम्ह विठ्ठलचि बोले । ऐक पां वहिलें तुकारामा ।। १ ।। तुकारामा तुवां केले जे अभंग । करिती जे कां जगीं नित्य पाठ ॥ २ ॥ जगीं पाठ करितां आवडी सभ्दावें । विपत्ति न होय त्या प्राण्यासी ।। ३ ।।. प्राण्याचे कल्याण होईल वा पाहे ।.