हे पान प्रमाणित केलेले आहे.
३५
भवपाश कर्में चुकतील ॥ ३ ॥
चुकती यातायाती विठोबाची आण ।
करा हे पठण जीवेभावें ॥ ४ ॥
जीवेंभावें करितां होईल दर्शन ।
प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ॥ ५ ॥
( १५ )
वेदाचे अभंग केले श्रुतिपर |
द्वादश सहस्त्र संहितेचे ॥ १ ॥
निघंट निरुक्त आणि ब्रम्हसुत्र ।
अवतार सहस्त्र उपग्रंथ ॥ २ ॥
अभंग हे कोटी भक्तिपर झाले ।
ज्ञानपर केले तितुकेची ॥ ३ ॥
पंचाहत्तर लक्ष वैराग्य वर्णिलें ।
नाम तें गाईलें तितुकेची ॥ ४ ॥
साठ लक्ष केला बोध या जगासी ।
वर्णिलें रूपासी तितुकेंची ॥ ५ ॥