Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३४

पदोपदीं पाहा श्रीमुख चांगलें ।
प्रत्यक्ष पाऊलें विठोबाची ॥ २ ॥
विठोबाचे भेटीं हरेल बा चिंता |
तुम्हालागीं आतां सांगितले ॥ ३ ॥
सांगितलें खरें विश्वाचिया हिता |
अभंग वाचिती जे कां नर ॥ ४ ॥
ते नर पठणीं जीवन्मुक्त झाले ।
पुन्हां नाहीं आले संसारासी ।। ५ ।।
संसार उडाला संदेह फिटला |
पूर्ण तोचि झाला तुका म्हणे ॥ ६ ॥

( १४ )

चार कोटि एक लक्षाचा शेवट |
चौतिस सहस्त्र स्पष्ट सांगितले ।। १ ।।
सांगितले तुका कथोनियां गेला
बारा अभंगाला सोडूं नका
सोडूं नका तुम्हा सांगितलें वर्म ।