हे पान प्रमाणित केलेले आहे.
३३
होईल सद्भक्ति येणें पंथें ।। ४ ।।
सद्भक्ति झालिया सहज साक्षात्कार |
होईल उद्धार पूर्वजांचा ॥ ५ ॥
साधतील येणें इहपरलोक ।
सत्य सत्य भाक माझी तुम्हां ॥ ६ ॥
परोपकारासाठी सांगितलें देवा ।
प्रासादिक मेवा ग्रहण करा ॥७॥
येणें भवव्यथा जाईल तुमची ।
सख्या विठ्ठलाची आण मज ||८||
टाळ आणि कंथा धाडिली निशाणी ।
घ्या रे ओळखोनि सज्जनहो ॥९॥
माझें दंडवत तुम्हां सर्व लोकां ।
देहासहित तुका वैकुंठासी ।। १० ।।
(१३)
सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा ।
अनुभव पाहा पदोपदीं ।। १ ।।