Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ लीन झाली वृत्ति ब्रह्मातें मिळाले । जळांत आटलें लवण जैसें । २ ॥ लवण जैसें पुन्हां जळाचे बाहेरी । येत नाहीं खरें त्यांतूनीया || ३ || त्यासारिखे तुम्हीं जाणा साधुवृत्ति | पुन्हां न मिळती मायाजळीं ॥ ४ ॥ मायाजाळ त्यांना पुन्हां रे बाधेना । सत्य सत्य जाणा तुका म्हणे ।। ५ ।। ( १२ ) स्वर्गलोकींहून आले हे अभंग । धाडियेले सांग तुम्हांलागीं ॥ १ ॥ नित्यने में यांसी पढतां प्रतापें । जळतील पापें जन्मांतरिचीं ॥ २ ॥ तथा मागें पुढें रक्षी नारायण । मांडिल्या निर्वाण उडी घाली ॥ ३ ॥ बुद्धीचा पालट नांसेल कुमती ।