या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
सांगतों मी तुम्हां ऐका मनोगत | राहतो मूर्खवत जगामाजीं ॥ ३ ॥ जगात पिशाच्च अंतरीं शहाणा । सदा ब्रह्मीं जाणा निमग्न तो ॥ ४ ॥ निमग्न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाह्य भेद वेगळाले ।। ५ ।। वेगळाले भेद किती त्या असती । हृद्गत त्याची गती न कळें कवणा ॥ ६ ॥ न कळे कवणाला त्याचें हेंचि वर्म । योगी जाणें वर्मं खूण त्याची ॥ ७ ॥ खूण त्याची जाणे जे तैसे असती । तुका म्हणे भ्रांती दुजियाला || ८ | ( ११ ) दुजियाला भ्रांती भाविकाला शांती | साधूंचीं ती वृत्ति लीन झाली ।। १ ।।