पान:नित्यनेमावली.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० असें हें साधन ज्याचें चितीं वसें । मायाजाळ नासें तुका म्हणे ॥ ४ ॥ ( ९ ) मायाजाळ नासें या नासेंकरूनि । प्रीति चक्रपाणी असो द्यावी ।। १ ।। असो द्यावी प्रीती साधूंचे पायांसी कदा कीर्तनासी सोडूं नये ॥ २ ॥ सोडूं नये पुराणश्रवण कीर्तन | । मनन निदिध्यास साक्षात्कार ।। ३ ।। साक्षात्कार झालिया सहज समाधि तुका म्हणे उपाधि गेली त्याची ।। ४ ।। ( १० ) गेली त्याची जाणा ब्रह्म तोचि झाला । अंतरीं निवाला पूर्णपणें ।। १ ।। पूर्णपणे घाला राहतो कैशा रीती । त्याची आतां स्थिती सांगतो मी ॥ २ ॥