हे पान प्रमाणित केलेले आहे.
२९
(७)
ओळखा रे वस्तु सांडा रे कल्पना |
नका आडराना जाऊं झणीं ॥ १ ॥
झणीं जाल कोठें बुडवाल हीत ।
विचारी मनांत आपुलिया ॥ २ ॥
आपुलिया जीवें शिवासि पहावें ।
आत्मसुख घ्यावें वेळोवेळां ॥ ३ ॥
घ्यावें आत्मसुख स्वरूपीं मिळावे ।
भूतीं लीन व्हावे तुका ह्मणे ॥ ४ ॥
(८)
भूतीं लीन व्हावें सांगावें नलगेचि |
आतां अहंकाराची शांति करा ॥ १ ॥
शांति करा तुम्हीं ममता नसावी ।
अंतरीं वसावी भूतदया ॥ २ ॥
भूतदया ठेवा मग काय उणें ।
प्रथम साधन हेंचि असें ॥ ३ ॥