Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२८

उगवेल प्रारब्ध संतसंगे करुनी।
प्रत्यक्ष पुराणीं वर्णियेलें ॥ ४ ॥
वर्णियेलें एका गुणनामघोषें ।
जातील रे दोष तुका म्हणे ।। ५ ।।

(६)

दोष रे जातील अनंत जन्मींचे ।
पाय त्या देवाचे न सोडावे ।। १ ।।
आळवा शारंगधरा भावबळें ।
धरूनि केशव आणा भावबळें || २ ||
पापियां न कळे काही केल्या || ३ ||
न कळे तो देव संतसंगावाचुनि ।
वासना जाळोनि शुद्ध करा ।। ४ ।।
शुद्ध करा मन देहातींत व्हावें ।
वस्तुसी ओळखावें तुका म्हणे ।। ५ ।।