पान:नित्यनेमावली.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७ जैसी गंगा वाहे तैसें त्याचें मन । भगवंत जाण त्याचे जवळीं ॥ १ ॥ त्याचे जवळी देव भक्तिभावें उभा । स्वानंदाचा गाभा तथा दिसे ॥ २ ॥ तथा दिसें रूप अंगुष्ठप्रमाण | अनुभवी खूण जाणती हे ।। ३ ।। जाणती हे खूण स्वात्मानुभवी | तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ५ ॥ ( ५ ) ज्याची त्याला पदवी इतरां न साजे । संताला उमजें आत्मसुख ॥ १ ॥ आत्मसुख घ्यारे उघडा ज्ञानदृष्टी । यावीण चावटी करूं नका ॥ २ ॥ करूं नका कांहीं संतसंग धरा । पूर्वीचा तो दोस उगवला || ३ ||