पान:नित्यनेमावली.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

t २६ तोचि ज्ञानी खरा तारी दुजीयांसी । वेळोवेळां त्यांसी शरण जावें ॥ ३ ॥ आपण तरेल नव्हे तें नवल । कुळें उद्धरील सर्वांचीं तो ॥ ४ ॥ शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणे कुळ उद्धरीले ॥ ५ ॥ (३) उद्धरीलें कुळ आपण तरला । तोचि एक झाला त्रैलोक्यांत ॥ १ ॥ त्रैलीक्यांत झालें द्वैतचि निमालें । ऐसें साधियेलें साधन बरवें ।। २ ।। बरवे साधन सुख शांती मना । क्रोध नाहीं जाणा तिळभरी ॥ ३ ॥ तिळभरी नाहीं चित्तासी तो मळ तुका म्हणे जळ गंगेचें तें ॥ ४ ॥