Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५
बारा अभंग

जन्माचें तें मूळ पाहीलें शोधून ।
दुःखासी कारण जन्म घ्यावा ॥ १ ॥
पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी ।
नरदेहा येऊनि हानि केली ॥ २ ॥
रजतमसत्त्व आहे ज्याचे अंगीं ।
याच गुणें जगीं वायां गेला ॥ ३ ॥
तम म्हणजे काय नरकचि केवळ ।
रज तो सबळ मायाजाळ ॥ ४ ॥
तुका म्हणे येथे सत्वाचें सामर्थ्य |
करावा परमार्थ अहर्निशीं ।। ५ ।।

(२)

अहर्निशीं सदा परमार्थ करावा ।
पाय न ठेवावा आडमार्गी ।। १ ।।
आडमार्गी कोणी जन जे जातील ।
त्यांतूनी काढील तोचि ज्ञानी ॥ २ ॥