हे पान प्रमाणित केलेले आहे.
२४
करि पारायण । तव दासोऽहं नारायण ।
हरि नारायण गुरु नारायण ॥
लक्ष्मीश्रीरंगधर सीतारघूवीर राधेगोविंदा ।
हरि हरि राधे गोविंदा ।
रखुमाई पांडुरंगा (तीन वेळा)
शनिवार - मारुती सखया बलभीमा ।
भजनालागी दे प्रेमा ॥ (२ वेळ)
भजनालागी दे प्रेमा ॥ (३)
मारुती सखया बलभीमा ।
भजनालागी दे प्रेमा । (२ वेळा)
रविवार - सांब सदाशिव सांब सदाशिव सांब
सदाशिव सांब हरा हरा ( सावकाश २ वेळा
जलद २ वेळा. पुन्हां सावकाश २ वेळा.)
बारा अभंग
जन्माचें तें मूळ पाहीलें शोधून |
दुःखासी कारण जन्म घ्यावा ॥ १ ॥
पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी |
नरदेहा येऊनि हानि केली ॥२॥