हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२
ऐशी कामधेनू व्यासानें पाळिली |
शुकानें वळिली जनकाघरीं ||३|
तुका म्हणे ऐसें भाग्य नरा भेटें ।
अभागी करंटे वायां गेले ||४||
(८)
देह तो पंढरी प्रेम पुंडलीक |
स्वभाव सन्मुख चंद्रभागा ||१||
विवेकाची वीट आत्मा पंढरीराव |
जेथे तेथें देव ठसावला ॥२॥
क्षमा दया दोन्ही रुक्मिणी ते राई ।
दोन्हींकडे पाही उभी असे ॥ ३॥
बुद्धि व वैराग्य गरुड हनुमंत |
कर जोडोनि तेथें पुढे उभे ॥४॥
तुका म्हणे आम्ही देखिली पंढरी ।
चुकविली फेरी चौ-यांशीची ||५||
रात्रीचे भजन
सोमवार-सांब सदाशिव सांब सदाशिव
सांब सदाशिव सांब ( जलद दोन वेळा)
सांब सदाशिव सांब (उंच स्वरात १ वेळ )