Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ शांति क्षमा यमुना सरस्वती । अशी पदें एकत्र जेथें होतीं । स्वानुभव स्नान हें मुक्तस्थिती ||१|| सद्बुद्धीचें घालोनि दर्भासन | वरी सद्गुरुची दया परिपूर्ण | शम दम अंगीं विभूतिलेपन । वाचे उच्चारी केशवनारायण ||२|| बोधपुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां । भक्ति बहीण आली असे गांवा | आतां संध्या करूं मी कैशी केव्हां ॥३॥ सहज कर्मे झालीं ब्रह्मार्पण | । ऐसें ऐकोनी निवती साधुजन | जन नोहे अवघाचि जनार्दन । एका जनार्दनी लाधली निजखूण ||४|| (७) निरंजनीं वनीं देखिली मी गाय | तीन तिचे पाय चार मुख ॥१॥ सहस्त्र तिचे नयन नब तिचे कान | सत्रावीचें स्थान एक शिंग ||२||