Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ देखे भ्रमरगुंफा गडद ओवरी । ओटपीठावरूती शोभे बरी । परमानंद आहे तया घरीं ॥५॥ बोधबळिया प्रवेशलों तेथ । अहंकार झाला वाताहत | विजयदुंदभि वाजति अनुत । ब्रह्मदृष्टींत पावलों निजविश्रांत ||६|| भक्तिनिशाण चढविलें वरी । $1 जें कां ब्रह्म भासत चराचरीं । रामनामें गर्जती जयजयकारीं । दासपण न उरे तेथें उरो ॥७॥ (४) सखया रामा विश्रांति तुझे नामी । म्हणउनि मजला ने त्वरें निजसुखधामीं ॥धृ॥ अवचट सुकृतें नरदेहा झालो भेटी । पशु सुत-जाया धन-धामीं प्रीती मोठी माझीं माझीं म्हणुनि म्या धरिली पोटीं | यांच्या संगें भोगिल्या दुःख-कोटी ||१|| सोडुनि स्वहिता धावलों दिशा दाही । शववत झालों मागुता कौतुक पाही ।