हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८
(३)
काय सांगू या समर्थाची थोरी ।
भजकासी आपणाऐसा करी ॥ ध्रु० ।।
सद्गुरुराजा तन्मय छत्रपति ।
मज करूनी सेवे अधिपति ।
सोऽहं शब्द सनद देउनि हातीं ।
शिरीं हात ठेविला मूद्रांकित ॥ १ ॥
अहंकाराचे दुर्ग आवरिले ।
तयावरी मजला पाठवीलें ।
पूर्वद्वारें त्रिकुट देखीयेलें ।
रजोदृष्टी ब्रम्ह्यासी जिंकीयेलें ||२||
तेथुनि ऊर्ध्वपंथे पश्चिममार्ग पाहे ।
सत्वगुणीं श्रीहाटीं विष्णु आहे |
तया वळंघोनी वरूता जाय |
तमोगोल्हाटी रुद्र दिसता हें ||३||
ज्ञानशास्त्र घेऊनिया हातीं ।
केली तमो-अज्ञानाची शांतीं ।
पुण्यगिरी तेथुनि देखे पुढती ।
शुद्ध अधिष्ठानीं विश्वमूर्ती ॥४॥
उभा राहोनि तया गिरीवरी ।