पान:नित्यनेमावली.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेथें काळ कदा न धजे | सिद्ध पुरुष तो योग साधुनि | तापा स्तवितो करून हरण | आपुला आपण राहे निमग्न | त्यालाचि प्राप्ति होय चराचर अवघेंचि ब्रह्म आहे ॥२॥ सद्गुरूकृपा जखमचि वारी । ज्याला घाव लागेल तोचि घायाळगती घुमतो ॥ बीजमंत्र हा जप गायत्री । अष्टोप्रहार योजितो साधन घडि पळ घडि साधितो ॥ अहंभावे मीपण तनधन | गुरुचरणीं अर्पितो तो हा मूळ पिस्या इच्छितो । अखंड तन्मय त्यात लुब्धनि । निजवस्तु लक्षितो लोचनों । निरपेक्ष तो निर्मळ प्राणी । जगांत वेडा राहे अंतरी ज्ञानबोध- रस पिये ॥३ सद्गुरुकृपा उत्तम ज्यासी । सहज हातासी आली त्याला निजवस्तु लाधली || पाहातां पाहतां आत्मज्योत हो । बैराग्यें पाजळली चिन्मय वस्तु डळमळली || शाहालिंग संतप्रमाण | धन्य गुरुमाउली आनंदे हरिवर कृपा केली || कवनकटाक्षे करि सिद्धांत | गणपति भीमसेन गातो सभेत । गुरुपुत्र तो ज्ञानवंत | ऐंकुनि तल्लिन होये लुंगरा व्यर्थ चावटी राहे ॥४॥