पान:नित्यनेमावली.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ॥२॥ मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती । नामसंकीर्तनीं नित्यानंदे नाचती ॥३॥ गुरुभजनाचा महिमा न कळे निगमां आगमांसी । अनुभव जे जाणनी ते गुरुपदिचे अभिलाषी ॥४॥ प्रदक्षिणा करुनी देह भावें वाहिला | श्रोरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ॥५॥ (२) अलक्ष्य लक्षुनि पाहे निजवस्तु । परात्पर चिन्मय ब्रह्मरुप तेज प्रत्यक्ष आहे || गुरुपद वंदुनि आधि पाहि तूं | हृदयांतरि शोधुनि मनातें धूर्त करी बोधुनी ॥ कामक्रोध मदमत्सर अंगीं। दंभाहंकार जिरवुनी द्वैत- कल्पनामार त्यागुनि || एक ग्रे मन स्वस्थ करोनि । बैस पद्मासनीं मुद्रा लाव आत्मभाषणीं ॥ दृष्टीं आंत दृष्टि सुरंग करूनियां समदृष्टि मग | नाना तऱ्हेचे रंग सुरंग | रक्त श्वेतवत आहे । पुढें नीलवर्ण तेज जाणावें ॥१॥ नोलवर्ण तें बिबकाशीं । चेतन्याची मुस त्यामध्यें वस्तु जडली असे ॥ त्रिकुट भेदुनी उलट जातां । मीन मार्गे धसे रूप अरूप होउनी प्रवेश || उन्मन होऊनिया ब्रह्मरहरीं। समाधि लावुनि बसे