गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा| मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।
नमो शारदा मूळ चत्वारि वाचा । गमो पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् |
देवीं सरस्वतीं व्यासऺ ततो जयमुदीरयेत् || २ ||
श्रूयतां देव देवेश नारायण जगत्पते ।
त्वदीयनामध्यानेन कथयिष्ये शुभा: कथा:|| ३ ||
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् |
एकं नित्य विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् |
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि।। ४ ।।
सद्गुरुनाथ माझे आई । मला ठाव द्यावा पायीं ॥ ( २ वेळ )
मला ठाव द्यावा पायीं । ( २ वेळ )
सद्गुरुनाथ माझे आई | मला ठाव द्यावा पायीं ॥ ( २ वेळ )
पहिलें पाहतां श्रीमुख | तहान हरपली भूक || १ ||
पहा पहा डोळेभरी । मूर्ति सांवळी गोजिरी || २ ||
रवि शशि ज्याच्या कळा । तो हा मदनाचा पुतळा || ३ ||
तुका म्हणे वर्णू काय | घेतो अलाया बलाया ।। ४ ।।